आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहराचे नामांतर केल्याविरोधात औरंगाबाद नामांतरविरोधी कृती समितीने ४ मार्चपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर बेमुदत आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. यास विविध पक्ष, संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी समर्थन दिले आहे. शहराची ऐतिहासिक व सांस्कृतिक ओळख पुसू देणार नाही, अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली आहे.\ औरंगाबाद नामांतरविरोधी कृती समितीत १५ च्या जवळपास पक्ष, संघटना सहभागी आहेत. साेबतच विविध सामाजिक संघटनांचे समर्थन मिळत आहे. शहराशी भावनिक नाते : कामगार हितार्थ कंत्राटी कामगार संघटनेच्या अध्यक्षा लीलाबाई मगरे म्हणाल्या, माझे बालपण याच शहरात गेले. मी इतिहास वाचला असून विद्यार्थ्यांनाही ताे सांगितला आहे. महापुरुषांचा आदर आम्हीही करतो. पण राजकीय फायद्यासाठी शहराचे नाव बदलू देणार नाही. त्यासाठी लढा सुरू ठेवू.
...तर ‘खडकी’ नाव द्या : द्वेषाचे बीज पेरण्याचे काम नामांतराच्या माध्यमातून होत आहे. त्यामुळे आमचा औरंगाबादच्या नामांतराला विरोध आहे. आपल्या देशाची मिश्र संस्कृती आहे. त्यामुळे अनेक शब्द उर्दू, फारसी, मराठी, हिंदीतील आहेत. व्यक्तिनामाला विरोध असेल तर शहराला खडकी हे नाव द्या. खडकी हे नाव जुने आहे तसेच खडकेश्वर हे ग्रामदैवतसुद्धा आहे, असे मुक्त पत्रकार तृप्ती डिग्गीकर म्हणाल्या.
नवीन जिल्ह्याला संभाजी महाराजांचे नाव द्या ध्रुवीकरणाच्या राजकारणातून नामांतर करण्याचा डाव काही राजकीय पक्षांचा आहे. औरंगाबाद शहराची जागतिक पातळीवर ओळख आहे. समाजात तेढ निर्माण करून ध्रुवीकरणाचे राजकारण करून नामांतर करण्यास आमचा विरोध आहे. सरकार काही नवीन जिल्हे तयार करणार आहे. त्यापैकी एखाद्या जिल्ह्याला छत्रपती संभाजी महाराजांचे नाव द्यावे, अशी मागणी नामांतरविरोधी कृती समितीचे सदस्य गौतम खरात यांनी केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.