आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअल्पसंख्याक समुदायाची शिष्यवृत्ती बंद करणे यासह विविध प्रश्नांसाठी सोमवारी (१९ डिसेंबर) पैठण गेट येथे आंदोलन होणार आहे. अशफाकउल्लाह व रामप्रसाद बिस्मिल यांच्या शहीद दिनानिमित्त हे आंदोलन होत आहे. देशात व राज्यात सरकारने अल्पसंख्याक समाजाची वाईट अवस्था करून टाकली आहे. याकडे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन होईल, असे तंजीम ए इंसाफचे राज्य अध्यक्ष एस. जी. शुत्तारी, राज्य सचिव अशपाक सलामी, डॉ. एस. एम. नईम, दलित आंदोलनचे राज्य सहसचिव मधुकर खिल्लारे, जिल्हाध्यक्ष भास्कर लहाने यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.