आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुक्यात सध्या कृषिपंपधारकांकडे थकीत असलेल्या बिलांसाठी महावितरणच्या वतीने कृषिपंपांचा वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम सुरू अाहे. चार हजार शेतकऱ्यांच्या कृषिपंपांची वीज तोडण्यात अाली अाहे, मात्र यातील ३ हजार ७१६ शेतकऱ्यांनी थकीत बिल भरणा केला. त्यातील शेकडाे कृषिपंपधारकांना वीज जोडणी मिळत नसल्याने शुक्रवारी (दि.२) शेकडो संतप्त शेतकऱ्यांनी शहरातील महावितरणच्या कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी केली.
तालुक्यात रब्बीचे क्षेत्र वाढत असून सध्या जायकवाडीच्या डाव्या उजव्या कालव्यास आपेगाव- हिरडपुरी बंधाऱ्यांत पाणी अाहे. मागील पंधरा दिवसांपासून जायकवाडीच्या डाव्या कालव्यातून ३०० क्युसेक वेगाने रब्बी हंगामासाठी पाणी सोडण्यात आले आहे. आपेगाव व हिरडपुरी या बंधाऱ्यांतही मुबलक साठा असल्याने शेतीला पाणी मिळेल असे वाटत होते, मात्र मागील महिन्यात चार हजारांवर कृषिपंपांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आल्याने शेतकऱ्यांना रब्बीच्या पिकांना केवळ विजेअभावी पाणी देता येत नाही, तर दुसरीकडे शेतकऱ्यांनी थेट बिल भरले तरी विजेची जाेडणी २४ तासांत का नाही, असा सवाल या वेळी शेतकऱ्यांनी केला. मात्र शहरातील महावितरण कार्यालयात एकही जबाबदार अधिकारी नसल्याने शेतकऱ्यांनी आमचा तेलंगणात समावेश करा, तेथे मोफत वीज दिली जाते असे सांगितले. येथे थकीत बिल भरूनही वीज मिळत नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. या वेळी रवींद्र शिंदे, दत्ता मापारी, किरण कापरे, सुदाम शिंदे, महादेव मापारी आदी उपस्थित होते. एकीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वीज खंडित करणार नाही असे म्हणतात, तर दुसरीकडे असा प्रकार होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.