आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआपली संस्कृती ऋषींची आहे व वेदांचा धर्म आहे. वर्तमानकाळात मनुष्याला माणूस बनवणारी एकमेव संस्था आर्य समाज आहे. महर्षी दयानंद सरस्वतींच्या २०० व्या जयंतीनिमित्त हे पुस्तक समाजाला उपयुक्त असल्याचे मत जयसिंगराव गायकवाड यांनी व्यक्त केले. गारखेडा परिसरातील आर्य समाज व उपप्रधान सुभाष वेदपाठक लिखित व संकलित “दैनिक अग्निहोत्र’ या पुस्तकाचे प्रकाशन ज्योतीनगरातील विश्वरूप हॉलमध्ये झाले.
कार्यक्रमास माजी नगरसेवक संजय हळनोर, डॉ. लक्ष्मण माने, अंजू माने, पतंजली योग समितीचे रमाकांत देसाई, वेदपाठक परिवाराचे डॉ. वेदपाठक, महामुनी परिवाराचे प्रशांत महामुनी, आर्य समाज परिवाराच्या प्रमुख डॉ. सुजाता करजगावकर, अखिल भारतीय पुरोहित महासंघाचे जगदीश पलंगे, मनोज शर्मा, पं. कमलाकर शिवपुरी यांची उपस्थिती होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.