आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदोलनाचा इशारा:कृषी सहायकांना हवे मोबाइलसाठी 1500 रु.,15 ऑगस्टनंतर व्हॉट्सअॅप ग्रुपमधून बाहेर पडणार

औरंगाबाद10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिवसेंदिवस मोबाइल डेटावरील खर्च वाढत आहे. म्हणून दरमहा १५०० रुपये द्यावेत. ऑनलाइन कामांसाठी लॅपटॉप उपलब्ध करावेत, या मागणीसाठी कृषी सहायकांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. त्याचा पहिला टप्पा म्हणून ते १५ ऑगस्टनंतर शासकीय व्हॉट्सअॅप ग्रुपमधून बाहेर पडणार आहेत.

या संदर्भातील निवेदनात कृषी सहायक संघटनेचे अध्यक्ष संदीप केवटे, सरचिटणीस शिवानंद आडे, कोशाध्यक्ष वसंत जारीकोटे यांनी म्हटले आहे की, महाडीबीटीमधील स्थळ पाहणी अहवाल मोबाइलवर अपलोड होत नाहीत. तलाठ्यांना ऑनलाइन कामासाठी लॅपटॉप मिळतो. डेटा चार्जिंगसाठी दरवर्षी रक्कम मिळते. मग कृषी सहायकांवर अन्याय कशासाठी? वरिष्ठ स्तरावरून स्वखर्चाने कामे करण्याचा दबाव टाकला जातो. वेळीच कामे न झाल्यास कारवाईच्या धमक्या दिल्या जातात. म्हणून आम्ही काही टप्प्यांमध्ये आंदोलन करणार आहोत. २२ ऑगस्ट रोजी विभागीय कृषी सहसंचालकांना निवेदन देऊन धरणे आंदोलन केले जाईल. १ सप्टेंबरपासून पीक प्रात्यक्षिकांचे जिओ टॅगिंग ऑफलाइन होईल. १५ सप्टेंबरपासून काम बंद करण्यात येईल.

बातम्या आणखी आहेत...