आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकृषिदूतांचे औरंगाबाद तालुक्यातील घारदोन तांडा येथे आगमन झाले. यावेळी गावातील शेतकऱ्यांनी त्यांचे स्वागत केले. हे विद्यार्थी धनेश्वरी मानव विकास मंडळ, कृषी महाविद्यालय गेवराई तांडा येथे चौथ्या वर्षात शिक्षण घेत आहेत. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आशिष वैद्य, कार्यक्रम समन्वयक डॉ. एस. आर. सुरवसे, डॉ. आर. के. डिग्रस्कर, डॉ.एस.टी.टिमके, प्रा.एस.जी.राखेलकर आदी प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली कृषिदूत अक्षय पदमे, गौतम सोनवणे, अविनाश तांदळे, अजय सपकाळ, प्रतीक राठोड, प्रेम राठोड, हर्ष राठोड, राहुल सुसुंद्रे, पवन पालकर, भगवान बोंगाणे, विवेक दासे आदी विद्यार्थ्यांनी घारदोन तांडा येथील शेतकऱ्यांचे अनुभव जाणून घेतले. त्यांना नवीन विकसित झालेल्या शेतीसंबंधी तंत्रज्ञाविषयी माहिती दिली. या प्रसंगी सरपंच संगीता गोकुळ धन्ने, ग्रामपंचायत सहायक संदीप नवपुते, ग्यानसिंग राठोड, हरचंद धने, वनसिंग राठोड, राजू राठोड यांच्यासह परिसरातील इतर प्रगतिशील शेतकरी उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.