आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हिंगोली:शेतकऱ्यांना आपमानास्पद वागणुक देताल तर लक्षात ठेवा, पिककर्ज वाटपावरून कृषीमंत्री दादा भुसे संतापले, विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांनाही फटकारले

हिंगोली7 महिन्यांपूर्वीलेखक: मंगेश शेवाळकर
  • कॉपी लिंक

हिंगोली जिल्ह्यात पिक कर्जाचे कमी प्रमाणात वाटप का झाले, कोविडची कारणे किती दिवस सांगत बसणार त्यातून नियोजन करता येत नाही का, कर्ज मागणीसाठी आलेल्या शेतकऱ्यांना अपमानास्पद वागणुक देतात तर लक्षात ठेवा अशा शब्दात कृषिमंत्री दादा भुसे यांनी रविवारी (ता. २७) बँकेच्या अधिकाऱ्यांना फटकारले. एवढेच नव्हे तर विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांची दूरध्वनीवरून खरडपट्टी काढली.

येथील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात कृषिमंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत बैठक झाली. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष गणाजी बेले, खासदार हेमंत पाटील, आमदार संतोष बांगर, आमदार राजेश नवघरे, आमदार तान्हाजी मुटकुळे, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी राधाबिनोद शर्मा, पोलिस अधिक्षक राकेश कलासागर, निवासी उपजिल्हाधिकारी अरुणा संगेवार यांच्यासह कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

यावेळी भुसे यांनी जिल्ह्यात कमी प्रमाणात झालेल्या पिक कर्ज वाटपावरून तिव्र नाराजी व्यक्त केली. बँकेकडून शेतकऱ्यांना योग्य वागणुक दिली जात नसल्याचे खासदार हेमंत पाटील, आमदार संतोष बांगर यांनी सांगताच ते चांगलेच संतापले. बँकेत कर्ज मागणीसाठी आलेल्या शेतकऱ्यांना सन्मानाची वागणुक द्यावी.कर्ज वाटपाचे प्रमाण वाढले पाहिजे. कोविडमुळे कर्ज वाटपाचे प्रमाण कमी झाले हे कारण आता किती दिवस सांगणार? त्यातून काही नियोजन करा अन शेतकऱ्यांना कर्ज वाटप करण्याच्या स्पष्ट सुचना त्यांनी दिल्या.

जिल्ह्यात पिक विमा कंपनीचे कार्यालयच कुठे आहे याची माहिती अधिकारी व पदाधिकाऱ्यांना देखील नसल्याने त्यांनी आश्‍चर्य व्यक्त करून पिक विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधून त्यांची खरडपट्टी काढली. जिल्हाधिकारी कार्यालयास सर्व कर्मचाऱ्यांचे भ्रमणध्वनी व पत्ता ठेवण्याच्या सुचना त्यांनी दिल्या.

जिल्ह्यात पिक नुकसानीचे पंचनामे करून त्याची तातडीने माहिती सादर करण्याच्या सुचना कृषिमंत्री भुसे यांनी कृषी विभागाला दिल्या. अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले असून हिंगोली जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहिर करण्याची मागणी खासदार पाटील यांच्यासह तीनही आमदारांनी केली.

जिल्हाधिकाऱ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप

जिल्ह्यात कोविडच्या परिस्थितीत भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासन व कृषी विभागाने केलेल्या नियोजनातून लाखो रुपयांचा भाजीपाला नागरिकांना मिळाला. त्यातून शेतकरी गटांनाही फायदा झाला. त्यामुळे कृषी मंत्री भुसे यांनी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या कामाचे कौतूक करून त्याच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली.

बातम्या आणखी आहेत...