आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदोलन:वाळूजमध्ये कृषिमंत्री सत्तारांचे बॅनर जाळले; राष्ट्रवादीच्या 15 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

औरंगाबाद5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल अपशब्द वापरल्यामुळे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्याविरोधात विनापरवानगी आंदोलन करून बॅनर जाळल्याप्रकरणी बजाजनगरच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या १५ कार्यकर्त्यांविरोधात एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पक्षाच्या वतीने ८ नोव्हेंबर रोजी बजाजनगरात हे आंदोलन केले होते. मात्र, त्याला पदाधिकाऱ्यांनी कुठलीही परवानगी न घेता सत्तारांचे छायाचित्र असलेले बॅनर जाळले. यात उमेश दुधाट, प्रशांत कदम, अतुल राऊत, ऋषिकेश पवार, रमेश अडसरे यांच्यासह इतर १५ जणांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.

बातम्या आणखी आहेत...