आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनुकूल अहवाल:कृषी दुकानदाराकडून हप्ता म्हणून चार हजार रुपयांची लाच घेणारा कृषी अधिकारी अटकेत

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कृषी सेवा केंद्राची तपासणी करून वरिष्ठांना त्याचा अनुकूल अहवाल पाठवून पाहणी टाळून महिन्याचा हप्ता सुरू करण्यासाठी कृषी अधिकारी अशोक रघुनाथ खेडकर (५०) चार हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडला गेला. शुक्रवारी त्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून अटक केली.

सध्या खुलताबाद पंचायत समितीत कृषी अधिकारी असलेल्या खेडकरकडे औरंगाबाद पंचायत समितीच्या कृषी अधिकारी पदाचा अतिरिक्त पदभार आहे. गेल्या काही दिवसांपासून त्याने कृषी सेवा केंद्र चालकांच्या दुकानांवर पाहणी सुरू केली. मात्र, सर्वांनाच हप्ता सुरू करण्यासाठी दबाव सुरू केला. या प्रकरणातील तक्रारदारालाही खेडकरने त्रास देणे सुरू केले. त्याला कंटाळून त्याने थेट एलसीबीचे अधीक्षक संदीप आटोळे यांच्याकडे तक्रार केली. त्यानंतर निरीक्षक नंदकिशोर क्षीरसागर, हनुमंत वारे यांनी सापळा रचला. शुक्रवारी दुपारी २.४५ वाजता खेडकरने तक्रारदाराला पुन्हा संपर्क करून हप्ता देण्यासाठी बोलावले. झाल्टा फाट्याच्या पुढे हॉटेलवर लाचेचे पैसे स्वीकारताच पथकाने त्याला पकडले.

बातम्या आणखी आहेत...