आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अहमदनगरमध्ये मंगळवारपासून राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा:महिला-पुरुषांचे 50 संघ होणार सहभागी; औरंगाबादचे संघ इ-क गटात

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेतर्फे 70 व्या पुरुष व महिला राज्यस्तरीय अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेचे अहमदनगर येथे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा 27 ते 30 डिसेंबरदरम्यान वाडिया पार्क क्रीडा संकुल, स्वस्तिक चौक, टिळक रोड, अहमदनगर येथे पार पडेल. स्पर्धेत महिला व पुरुष गटाचे 25-25 असे एकूण 50 संघ सहभागी होणार असल्याची माहिती, राज्य संघटनेचे सरचिटणीस आस्वाद पाटील यांनी दिली.

ही राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा इतिहासात पहिल्यांदाच एकाच वेळी 6 मॅटच्या क्रीडांगणावर पार पडणार आहे. या अगोदर नाशिक जिल्ह्याने अशा प्रकारे स्पर्धा घेण्याचे नियोजन केले होते, परंतू त्यांना एवढ्या मोठ्या संख्येने मॅट उपलब्ध झाल्या नव्हत्या. या स्पर्धेत आतापर्यंत पुरुष गटाचे सर्व संलग्न जिल्हे सहभागी होत असत, पण यंदा महिलांचे देखील सर्व संघ सहभागी झाले आहेत. नंदुरबार जिल्ह्याची स्थापना झाल्यापासून हा संघ पुरुष गटात खेळत होता, पण महिला गटात यंदा प्रथमच भाग घेत आहे. या सर्व सहभागी संघाची 6-6 गटात विभागणी करण्यात आली आहे. गतवर्षी झालेल्या स्पर्धेत मिळवलेल्या मानांकाप्रमाणे ही गटवारी तयार करण्यात आली आहे.

औरंगाबादसमोर सातारा, मुंबई उपनगरचे आव्हान

या स्पर्धेसाठी बुधवारी गटवारी जाहीर करण्यात आली आहे. औरंगाबादच्या पुरुष संघाचा इ गटात, तर महिला संघाचा क गटात समावेश करण्यात आला आहे. पुरुष गटात औरंगाबादसमोर बलाढ्य सातारा संघासह नाशिक व रत्नागिरीचे आव्हान असेल. महिला गटात औरंगाबादला मुंबई उपनगरचा सामना करावा लागले. तसेच नाशिक व लातूरचे मजबूत संघ देखील या गटात आहेत. स्पर्धेत पुरुषांच्या ब गटात, तर महिलांच्या अ व ब गटातून बाद फेरी गाठण्याकरता चुरशीचे सामने पहायला मिळतील.

स्पर्धेची पुरुष गटवारी पुढीलप्रमाणे

अ गट - अहमदनगर, कोल्हापूर, हिंगोली, सोलापूर. ब गट - मुंबई शहर, सांगली, रायगड, जळगाव. क गट - धुळे, नांदेड, बीड, पालघर. ड गट - मुंबई उपनगर, पुणे, परभणी, जालना. फ गट - ठाणे, नंदुरबार, सिंधुदुर्ग, लातूर, उस्मानाबाद. महिला अ गट - पुणे, ठाणे, परभणी, हिंगोली. ब गट - मुंबई शहर, धुळे, सातारा, जालना. ड गट - पालघर, रत्नागिरी, सोलापूर, उस्मानाबाद. इ गट - कोल्हापूर, नांदेड, अहमदनगर, बीड. फ गट - रायगड, सांगली, जळगाव, सिंधुदुर्ग, नंदुरबार.

बातम्या आणखी आहेत...