आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

योग्य औषधांचा वापर:यशस्वी होण्यासाठी उच्च ध्येय ठेवा : वैद्य देवपुजारी

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जीवनात यशस्वी होण्यासाठी उच्च ध्येय डोळ्यासमोर ठेवा, असे आवाहन दिल्लीतील भारतीय चिकित्सा पद्धती आयोगाचे अध्यक्ष वैद्य जयंत देवपुजारी यांनी केले.छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्था संचालित आयुर्वेद महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या नवीन वास्तूचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिकचे प्र-कुलगुरू डॉ. मिलिंद निकुंभ, डॉ. बाळासाहेब आहेर, संस्था सचिव पद्माकरराव मुळे, प्राचार्य डॉ. दत्ता पाटील आणि प्राचार्य डॉ. श्रीकांत देशमुख उपस्थित होते.

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना वैद्य देवपुजारी म्हणाले, आयुर्वेदात प्रशिक्षित शिक्षणतज्ज्ञांची कमतरता आहे. या त्रुटीकडे लक्ष देणे आवश्यक आहे. ज्ञान व अनुभवानंतर पदवी मिळते, पण चिकित्सा क्षेत्रात ज्ञानाचा परिणाम दिसल्यावर सन्मान मिळतो. त्यामुळे अभ्यासादरम्यान मिळालेल्या ज्ञानातून नैतिकता राखत योग्य औषधांचा वापर करून लोकांना व्याधीमुक्त करा. तंत्रज्ञानामुळे नवी उपकरणे आली आहेत. त्याचा योग्य वापर करण्याचा सल्लादेखील त्यांनी दिला. या वेळी डॉ. सुभाष भोयर, डॉ. दत्तात्रय शेळके, डॉ. उल्हास शिंदे, डॉ. गणेश डोंगरे, डॉ. जयश्री देशमुख आणि विभागप्रमुख, अधिकारीवृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी धन्वंतरी स्तवन झाले. डॉ. यशश्री वितोंडे, डॉ. शमिका जोशी, डॉ. मेघा सुरवसे आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...