आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुंग्या वाजवून स्वागत:​​​​​​​मुख्यमंत्र्यांचे उपहासात्मक स्वागत करण्यासाठी एमआयएम कार्यकर्ते रस्त्यावर, पोस्टर दाखवत आणि फुले उधळत केले मुख्यमंत्र्यांचे स्वागत

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • एमआयएमच्या दोन कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त मुख्य ध्वजारोहण करण्यात आले. दरम्यान विमानतळापासून कार्यक्रम स्थळापर्यंत एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांचे उपरोधिक स्वागत केले. विकासाबद्दल धन्यवाद असे पोस्टर दाखवत फुलांची उधळण केली. दरम्यान एमआयएमच्या दोन कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

एमआयने उपरोधिकपणे केले स्वागत
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी उपरोधिक स्वागत केले. बाबा चौक परिसरात शेकडो एमआयएम कार्यकर्ते एकत्र जमललेले होते. हातात स्वागताचे उपरोधिक फलक घेऊन कार्यकर्त्यांनी रस्त्यावर गर्दी केली. बाबा चौकात स्वागतासाठी चारही बाजूने कार्यकर्ते उभे होते. यावेळी खबरदारी म्हणून पोलिसांचाही तगडा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. शहरातील विमानतळ, बाबा पेट्रोलपंप, जिल्हा परिषदेची प्रशासकीय इमारत, सिद्धार्थ उद्यान अशा सर्व ठिकाणी पोलिसांचा ताफा तैनात करण्यात आला आहे.

एमआयएमच्या आंदोलनाविषयी जलील म्हणाले की...
'आम्ही आंदोलन करत असल्याचे कुठेही म्हटलेले नाही. शिवसेनेने पुस्तक काढून किती विकास केला हे आम्ही छापले आहे. एकाही पोस्टरवर आमच्याकडून निषेध करण्यात आलेला नाही. आम्ही तर फुले घेऊन स्वागतासाठी उभे होतो. तुम्ही काही केले नाही हे तुम्हाला माहिती आहे म्हणून आमच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.'असे औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...