आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिरीष बाेराळकर म्हणाले की:बॅडमिंटनमध्ये छोट्या जिल्ह्यांना पुढे आणण्याचे लक्ष्य

औरंगाबाद8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर येथे झालेल्या महाराष्ट्र बॅडमिंटन संघटनेच्या (एमबीए) निवडणुकीत औरंगाबादचे शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारप्राप्त शिरीष बोराळकर यांची ३१-२१ मतांनी वरिष्ठ उपाध्यक्ष आणि आंतरराष्ट्रीय मास्टर खेळाड सिद्धार्थ पाटील यांची ३२-२० मतांनी सहसचिवपदी निवड झाली आहे.

निवडीनंतर बोराळकर म्हणाले की, ‘संघटना म्हणून आम्ही आता छोटे जिल्हे व ग्रामीणस्तरावर बॅडमिंटन वाढीसाठी लक्ष्य देणार आहोत. त्यांच्याकडील चांगली गुणवत्ता पुढे आणण्यासाठी आमचा प्रयत्न राहिल. अनेक ठिकाणी संघटना आहेत, मात्र त्या सक्रीय नाहीत. त्यामुळे खेळाडू देखी मागे राहत आहे. संघटनेला सक्रीय करण्याचे काम हाती घेत आहोत. त्यांना खेळाडूंसाठी मोफत किट, टी शर्ट, शटल बॉक्स राज्य संघटनेकडून देण्यात येत आहे. स्थानिक प्रशिक्षकांनी माफक दरात प्रशिक्षण द्यावे, अशी इच्छा आहे.’ प्रशिक्षणाबद्दल ते म्हणाले की, आधुनिक प्रशिक्षणासाठी संघटना इंडोनेशियाच्या प्रशिक्षकांशी करार करुन वर्षभरासाठी त्यांना महाराष्ट्रात आणण्याचा प्रयत्न करणार आहे. राज्यातील प्रत्येक विभागात तीन महिने त्यांनी दररोज प्रशिक्षण करतील, असे नियोजन आहे. त्यामुळे खेळाडूंसह स्थानिक प्रशिक्षक देखील त्यामाध्यमातून अपग्रेड होतील. त्याचबरोबर, मास्टर्स स्पर्धेवर आमचे लक्ष्य असून त्यामुळे पालक वर्ग आमच्याशी जोडला जाईल. राज्यातील शासनाच्या प्रशिक्षण केंद्रावर खेळाडूंना माफक दरात सरावासाठी कोर्ट उपलब्ध झाले पाहिजे, यासाठी संघटनेच्या माध्यमातून पाठपुरावा करणार आहोत, असे बाेराळकर म्हणाले.

राज्यातील खेळाडूंचे राज्यात प्रशिक्षणावर भर : सिद्धार्थ पाटील आपल्या राज्यात गुणवंत खेळाडू आहेत. मात्र, हे खेळाडू प्रशिक्षणासाठी बाहेरच्या राज्यात जातात. त्यांना आपल्याच ठिकाणी उत्कृष्ट प्रशिक्षण व्यवस्था, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आम्ही माजी खेळाडूंकडून स्थानिक पातळीवर काय करता येईल, अशा सूचना मागवणार आहोत. त्यानंतर रोडमॅप तयार करणार आहोत. आमच्या खेळात क्लास आहे, आता मास वाढवण्यासाठी प्रयत्न आम्ही करणार आहाेत, असे नवनियुक्त सहसचिव सिद्धार्थ पाटील यांनी सांगितले.