आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एअर इंडियात केबिन क्रू:बारावी उत्तीर्ण युवतींना एअर इंडियात केबिन क्रूच्या नोकरीची संधी

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

बारावीत ६० टक्के गुण घेऊन उत्तीर्ण तरूणींसाठी एअर इंडियात “केबिन क्रू’ म्हणून नोकरी करण्याची संधी आहे. थेट मुलाखतीद्वारे निवड होईल. दिल्ली, मुंबई आणि नागालँडच्या दिमापूर येथे ६, १०, १२ जानेवारीदरम्यान मुलाखती होतील. १८ ते ३२ वयोगटातील उमेदवार ज्यांची उंची १५५ सेमी असेल त्यांना पासपोर्ट, पॅनकार्ड, आधार कार्ड व आवश्यक कागदपत्रांसह प्रत्यक्ष मुलाखतीला हजर राहता येईल.

एअर इंडियाच्या विमानातील प्रवाशांना उड्डाणाच्या वेळी सुरक्षेची काळजी घेण्यासंदर्भात डेमो देणे, सुरक्षा उपकरणांची कार्यक्षमता तपासणे, प्रवाशांना काही दुखापत झाल्यास त्यांची शुश्रूषा करणे, तातडीच्या वेळी उपाययोजना करणे, खाद्य-पेय पुरवणे, विविध सूचनांची घोषणा करणे, प्रवाशांच्या समस्यांचे निराकरण करणे आदी कामांसाठी एअर इंडियानेही भरती प्रक्रिया सुरू केली आहे.

अपडेट रिझ्युम असणे अनिवार्य
कुठलाही अनुभव नसलेल्यांची वयोमर्यादा १८ ते २२ आहे. मात्र अनुभवी युवतींना दहा वर्षे शिथिलक्षम असेल. म्हणजेच १८ ते ३२ पर्यंतच्या अनुभवींनाही संधी दिली जाणार आहे. बॉडी मास इंडेक्स (बीएमआय) १८ ते २२ दरम्यान असणे अनिवार्य आहे. अर्ज करण्यासाठी कुठल्याही प्रकारचे शुल्क आकारण्यात येणार नाही. पासपोर्ट, पॅन, आधार कार्ड सोबत असावे. मुलाखतीला येताना रिझ्युम अपडेट असणे अनिवार्य करण्यात आले आहे.

दिल्ली : ६ जानेवारी
दिल्ली येथील अॅसेक्स फार्म्स, ४ अरबिंदो मार्ग, आयआयटी फ्लायओव्हर क्रॉसिंगच्या समोर, हौज खास मेट्रो स्टेशनच्या बाजूला, नवी दिल्ली येथे सकाळी ९.३० ते १२. ३० दरम्यान उपस्थित राहावे लागणार आहे.

दिमापूर, नागालँड : १२ जानेवारी
हॉटेल अकासिया, ईस्ट पोलिस स्टेशनच्या समोर, दिमापूर, नागालँड या पत्त्यावर सकाळी ९ ते दुपारी १२ पर्यंत मुलाखती घेतल्या जाणार आहेत.

मुंबई : १० जानेवारी
स्केअर मार्ग, बी. एन. अग्रवाल कमर्शियल कॉम्प्लेक्स, विलेपार्ले, विलेपार्ले रेल्वे स्टेशनच्या शेजारी मुलाखती घेतल्या जातील. सकाळी ९.३० ते १२.३० पर्यंतची वेळ देण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...