आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराचिकलठाणा विमानतळावरून गुरुवारी सकाळी ८.४० वाजता मुंबईला जाणारे एअर इंडियाचे विमान अचानक रद्द झाल्याने १२२ प्रवाशांची तारांबळ उडाली. काही प्रवाशांना दिल्लीमार्गे प्रवास करावा लागला, तर काहींनी प्रवासाचे नियोजन पुढे ढकलले. तांत्रिक अडचणीमुळे विमान रद्द करण्यात आल्याचे प्रशासनाने सांगितले.एअर इंडियाचे विमान मुंबईहून येणारे विमान ८.१० वाजता चिकलठाणा विमानतळावर पाेहाेचते.
मात्र, गुरुवारी अचानक विमान रद्द झाल्याने प्रवाशांची मोठी अडचण झाली. अनेकांनी प्रवासच रद्द केला. परदेशी पर्यटकांनाही फटका बसला. अनेक परदेशी प्रवाशांना सकाळी ७ वाजेचे दिल्लीचे विमान पकडावे लागले. त्यामुळे औरंगाबाद ते दिल्ली अन् दिल्ली ते मुंबई असा वळसा घालून प्रवास करावा लागला. त्यामुळे वेळ आणि आर्थिक भुर्दंडही सहन करावा लागला.
एअर इंडियाच्या विमानात एकूण १२२ प्रवासी जाणार हाेते. यातील १५ प्रवासी दिल्लीला पाठवण्यात आले, तर काहींनी नंतर प्रवास करू असा निर्णय घेतला. पालकमंत्री संदिपान भुमरे यांना हे विमान रद्द झाल्याचे आधीच कळवण्यात आल्याने त्यांनी इंडिगोच्या विमानाने बुकिंग करून औरंगाबाद गाठले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.