आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विमानसेवा:एअर इंडियाची नांदेड-दिल्ली विमानसेवा 19 डिसेंबरपासून, प्रवासी बुकिंग सुरू

शरद काटकर / नांदेड7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • प्रवासी बुकिंग सुरू, 162 असेल आसनक्षमता, तीन दिवस उड्डाण

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर बंद केलेली एअर इंडियाची विमानसेवा ही पूर्वत सुरु करण्यात आली आहे. सुरवातीला नांदेड-आमृतसर अशी सेवा सुरु केली होती. परंतू, प्रवाशांच्या मागणीनुसार आता ही सेवा वाढवत पुढे दिल्लीपर्यंत करण्यात आली आहे. यासाठी एअर इंडियाकडून प्रवाशी बुकींग सुरु झाली आहे. ही सेवा दि.19 डिसेंबरपासून सुरु होणार आहे, अशी माहिती नांदेड स्टेशन मॅनेजर गजेंद्र गुठे यांनी दिली.

नांदेड ते अमृतसर, नांदेड ते दिल्ली आणि नांदेड ते चंदीगड अशी एअर इंडियाची सेवा कोरोनापूर्वी सुरु होती. मात्र, देशात कोरोनाचे थैमान पसरल्याने देशांतर्गतची विमानसेवा बंद करण्यात आली होती. त्यात वरील तिन्ही सेवा बंद होत्या. परंतू, सध्या कोरोनाचे सावट कमी झाल्याने केंद्र सरकारने देशांतर्गत विमानसेवा सुरु केली. त्यामुळे एअर इंडियानेही नांदेड-अमृतसर ही पुन्हा सेवा 10 नोव्हेंबरपासून सुरु केली होती. ती आठवड्यातून तीन दिवस नियमीत सुरु होती. मात्र, आता या सेवेत वाढ करुन ती दिल्लीपर्यंत सुरु केली आहे. यामुळे नांदेड येथील सचखंड गुरुद्वाराचे दर्शन घेण्यासाठी शिख भाविकांची व अन्य प्रवाशांची सोय झाली आहे. नांदेडहूनही शिख बांधव अमृतसर येथील सुवर्णमंदीराचे दर्शन घेण्यासाठी जात असतात. या दोन्ही पवित्र स्थळांना आता एअर इंडियाच्या विमानसेवेच्या माध्यमातून जोडल्या जात आहे.

असे असेल वेळापत्रक

दिल्ली ते नांदेड हे विमान दिल्ली येथून दि.19 डिसेंबर रोजी पहाटे 5.55 मिनीटाला उड्डाण घेऊन ते अमृतसरला सकाळी 7.10 वाजता पोहचेल. त्यानंतर 8.10 वाजता हे विमान उड्डाण करुन नांदेड येथे 10.45 वाजता पोहचेल. परत हे विमान नांदेड विमानतळाहून 11.45 वाजता उड्डाण घेऊन दुपारी 2.20 वाजता अमृतसर येथे पोहचेल. त्यानंतर 3.20 वाजता अमृतसरहून निघून सायंकाळी 4.35 वाजता दिल्ली विमानतळावर उतरेल.

आठवड्यातून तीन दिवस सेवा

ही विमानसेवा मंगळवार, बुधवार आणि शनिवारी सुरु राहणार आहे. सुरवातीचे भाडे दिल्ली ते नांदेड हे तीन हजार 956 रुपये असणार आहे. 162 आसनक्षमता असलेल्या या विमानसेवा कोविडच्या नियमानुसार प्रवाशांनी लाभ घ्यावा, असे आवाहन गजेंद्र गुठे यांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...