आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंजिनिअरिंग प्रदर्शन:आयसा इंजिनिअरिंग प्रदर्शन शुक्रवारपासून औरंगाबादेत

औरंगाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जगभरातील ऑटोमोबाइल उद्योगांना सुट्या भागांचा पुरवठा करणाऱ्या, इंजिनिअरिंगसह उद्योगाच्या सर्वच क्षेत्रांत प्रगतीची नवनवी शिखरे गाठणाऱ्या औरंगाबाद शहरात देशभरातील शेकडो उत्पादक, ऑटोमेशन, नवनवीन तंत्रज्ञान, सेवा उद्योग यांचे प्रदर्शन घडवणाऱ्या “आयसा इंजिनिअरिंग एक्स्पो’ प्रदर्शनाचे आयोजन १६ ते १९ डिसेंबरदरम्यान होत आहे. अयोध्यानगरी, आरटीओ ऑफिससमोर आयोजित या प्रदर्शनात दीडशेवर उद्योग सहभागी होत आहेत.

यासंदर्भात माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत संघटनेचे अध्यक्ष सूरज डुमणे, सचिव दत्तात्रय बेदडे, कोषाध्यक्ष सागर मालाणी, प्रकल्पप्रमुख मिलिंद उमदीकर, सहप्रकल्पप्रमुख जयराज पाटील, राजेश वैष्णव उपस्थित होते. बेदडे म्हणाले, प्रदर्शन एमएसएमई मान्यताप्राप्त आहे. एमएसआयसीचा सक्रिय पाठिंबा आहे. याशिवाय सीएमआयए, मसिआ, माकिआ, व्यापारी महासंघ, एमसीटीसी आदी संघटनांचे सहकार्यही मिळत आहे

श्रीराम नारायणन यांच्या हस्ते उद्घाटन : १६ डिसेंबर रोजी सीआयआय महाराष्ट्र काैन्सिलचे चेअरमन आणि इंटरेस्ट प्लस हाऊजरचे व्यवस्थापकीय संचालक श्रीराम नारायणन, सहकारमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उदघाटन होईल. याशिवाय खवय्यांचे आकर्षण असलेल्या विविध खाद्यपदार्थांची रेलचेल असलेले फूड कोर्टही यात आहे.

बातम्या आणखी आहेत...