आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ओयोच्या परिषदेत मांडलेल्या आकडेवारीतून:अजिंठा-वेरुळ ठरल्या सर्वाधिक पसंतीच्या ऐतिहासिक वास्तू; पूर्वीच्या तुलनेत 3.5 टक्के पर्यटन वाढले

औरंगाबाद12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारताचे पर्यटन वैविध्य आता डोंगरदऱ्या, समुद्र आणि शहरांच्या पलिकडे गेले आहे. जगातील सर्वात जुनी संस्कृती असलेल्या भारतात महामारीच्या दोन वर्षांत देशांतर्गत पर्यटनात मोठी वाढ झाली आहे. महामारी पूर्वीच्या तुलनेत 3.5 टक्के पर्यटन वाढले आहे, अशी माहिती ओयोने प्रकाशित केलेल्या अहवालात पुढे आली आहे.

अध्यात्मिक पर्यटनात महाराष्ट्रातील शिर्डीला सर्वाधिक पसंती दिली जात आहे. तर ऐतिहासिक पर्यटनात अजिंठा, वेरुळ या युनेस्कोचा दर्जा प्राप्त वास्तूंना पसंती मिळाली आहे. अध्यात्मिक पर्यटनात पुर्व भारतात वाराणासी, उत्तर भारतात अमृतसर तर दक्षिण भारतात तिरुपतीला पसंती मिळाली आहे. तर ऐतिहासिक पर्यटनात अजिंठा वेरुळ नंतर ताजमहाल, हंपी, खजुराहो आणि महाबलीपुराण यांना पसंती देण्यात आली आहे.

ऐतिहासिक पर्यटनात सर्वात महत्त्वाचे शहर

औरंगाबाद टुरिझम डेव्हलपमेंट फाऊंडेशनचे अध्यक्ष जसवंतसिंग राजपूत म्हणाले, औरंगाबाद टुरिझमच्या दृष्टीने महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील महत्त्वाचे शहर आहे. या अहवालातील आकडेवारीवरुन या गोष्टीला अधिक पुष्टी मिळाली आहे. प्रशासन आणि लोकप्रतिनिधीनी आक्रमकपणे काम करत दळणवळणाची साधने जुळवून आणली तर हा विकास आणखी कैक पटींनी वाढेल. याशिवाय शहर, जिल्हयातील अर्थव्यवस्थेला चालना मिळेल.

बातम्या आणखी आहेत...