आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

11 ते 15 जानेवारीदरम्यान 40 वर चित्रपटांची पर्वणी:अजिंठा-वेरूळ चित्रपट महोत्सव नोंदणी सुरू; कलावंतांचीही हजेरी

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जगभरातील सर्वोत्कृष्ट चित्रपट मराठवाड्यातील रसिकांपर्यंत पोहोचवणाऱ्या आठव्या अजिंठा-वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला ११ जानेवारीपासून सुरुवात होत आहे. हा महोत्सव प्रोझोन मॉलच्या आयनॉक्स थिएटरमध्ये राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवरील कलावंतांच्या मांदियाळीत होणार आहे. महोत्सवात सहभागी होण्यासाठी शुक्रवारपासून नोंदणीला सुरुवात झाली आहे. नाथ ग्रुप, महात्मा गांधी मिशन, यशवंतराव चव्हाण सेंटरचे जिल्हा केंद्र, मराठवाडा आर्ट कल्चर आणि फिल्म फाउंडेशनतर्फे या महोत्सवाचे आयोजन केले आहे. यंदा त्याला शासनाचे सहकार्य आहे. मनजित प्राइड ग्रुप आणि प्रोझोन मॉल यांचे विशेष सहकार्य आहे. महोत्सवात ४० वर चित्रपट, शॉर्ट फिल्म्स पाहता येतील.

ज्येष्ठ, तरुणांसाठी विशेष सवलत : नागरिकांना ५ दिवसांसाठी नाममात्र शुल्क द्यावे लागेल. ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांना विशेष सवलत देण्यात येईल.

अशी करा ऑनलाइन नोंदणी पेटीएम ॲपच्या इनसायडर तिकीट सेक्शनमध्ये ऑनलाइन नोंदणी करता येईल. प्रत्यक्ष नोंदणीसाठी १)आयनॉक्स प्रोझोन मॉल २)आयनॉक्स तापडिया, ३)आयनॉक्स, रिलायन्स मॉल ४) नाथ ग्रुप, पैठण रोड ५) एमजीएम स्कूल ऑफ फिल्म आर्ट््स, ६) निर्मिक ग्रुप, व्यंकटेश मंगल कार्यालयासमोर, ७) हॉटेल स्वाद, उस्मानपुरा, ८) हॉटेल नैवेद्य, सिडको बसस्टँड, ९) साकेत बुक वर्ल्ड, औरंगपुरा, १०) वरद सलोन, कॅनॉट प्लेस, ११) वरद सलोन, निराला बाजार, १२) वरद सलोन, रेल्वेस्टेशन रोड १३) एएमएफजिम, प्रतापनगर या केंद्रांवर नोंदणी करता येईल.

बातम्या आणखी आहेत...