आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अजित पवारांनाही एमओएचे अध्यक्षपद साेडावे लागणार:शरद पवारांनी 32 वर्षांनंतर सोडली होती कुस्ती परिषद

एकनाथ पाठक | औरंगाबाद9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्यापाठाेपाठ आता माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही लवकरच महाराष्ट्र ऑलिम्पिक असाेसिएशनच्या अध्यक्षपद सोडावे लागणार आहे. दिल्ली उच्च न्यायालयाच्या वतीने नियुक्त भारतीय ऑलिम्पिक महासंघाचे हंगामी अध्यक्ष अनिल खन्ना यांनी ११ जुलै २०२२ रोजी या संदर्भातील परिपत्रक काढले आहे. यातील मार्गदर्शक सूचनांनुसारच आता महाराष्ट्र ऑलिम्पिक असाेसिएशनला आपल्या घटनेमध्ये बदल करावा लागणार आहे. नेमक्या याच आधारे अजित पवार यांना एमओएच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागणार आहे.

दाेन दिवसांपूर्वीच विदर्भ केसरी खासदार रामदास तडस यांनी कुस्तीगीर परिषदेवर वर्चस्व स्थापित केले आणि त्यांनी टाकलेल्या या डावामुळे शरद पवारांची ३२ वर्षांपासूनची सद्दी संपुष्टात आली.

राज्य ऑलिम्पिक संघटनेच्या घटनेवर आक्षेप : नवनियुक्त हंगामी प्रशासक अनिल खन्ना यांनी पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर तातडीने भारतीय ऑलिम्पिक महासंघाला सलग्न राष्ट्रीय स्पाेर्ट््स फेडरेशन, राज्य ऑलिम्पिक असाेसिएशन, यूटी ऑलिम्पिक असाेसिएशनच्या अध्यक्ष, सचिव व महासचिवांना पत्र पाठवले. यात त्यांनी संबंधित संघटनांच्या घटनेवर आक्षेप घेतला. यामध्ये अनेक त्रुटी आहेत. यामुळे हाेणाऱ्या वादामुळे आता तत्काळ स्पाेर्ट््स काेड लागू करण्याच्या सूचना केल्या आहेत. यासाठी या काेडमध्ये महत्त्वाचे नियम घालून दिले आहेत.

यात अजित पवारांची अडचण
- दाेन टर्म अथवा आठ वर्षांपेक्षा अधिक काळ संघटनेवर राहता येणार नाही.
- अजित पवार २०१३ ते २०१७ व २०१७-२०२१ आणि २०२१ ते आजपर्यंत महाराष्ट्र ऑलिम्पिक असाेसिएशनचे अध्यक्ष आहेत.
- एमओए अध्यक्षपद साेडल्यानंतर पवार यांना स्पाेर्ट््स काेडनुसार पुढील पाच वर्षांपर्यंत एमओएमध्ये रेड कार्ड असेल. त्यांना पाच वर्षे सदस्य वगळता इतर पदांवर संधी नसेल.

बातम्या आणखी आहेत...