आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हल्लाबोल:धमक असेल तर सावरकरांना भारतरत्न द्या, अजित पवारांचे सरकारला आव्हान; म्हणाले - महापुरुषांच्या अवमानावर गप्प का?

छत्रपती संभाजीनगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

​''धमक असेल तर सावरकरांना तात्काळ भारतरत्न द्या.'' असे आव्हान राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी भाजपला दिले. ते आज छत्रपती संभाजीनगर येथील मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानात आयोजित 'मविआ'च्या वज्रमूठ सभेत बोलत होते.

सडकून टीका, भाजपला सवालही

अजित पवारांनी राज्यातील सरकार आणि भाजपवर सडकून टीका करीत सवाल विचारला. ते म्हणाले, सावरकरांबद्दल बोलताच भाजप शिंदे सरकारने गौरव यात्रा काढली. मात्र, छत्रपती शिवाजी महाराज आणि महात्मा फुले, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल वक्तव्य केले तेव्हा का मुग गिळून गप्प बसलात.

जनाची नाही मनाची तरी लाज असू द्या

अजित पवार म्हणाले की, ''महाराष्ट्र सरकार हे शक्तीहीन सरकार आहे'' हे सुप्रीम कोर्टाने मत व्यक्त केले. राज्य सरकारला जनाची नाही तर मनाची काही लाज वाटायला हवी. तुमच्यात जर धमक असेल तर सावरकरांना तात्काळ भारतरत्न द्या.

भाजपला आव्हान

अजित पवार म्हणाले की, भाजप-शिंदे सरकारची सावरकर गौरव यात्रा ही केवळ मूलभूत प्रश्नांपासून लक्ष विचलित करण्यासाठी आहे, त्यांना सावरकरांबद्दल कोणताही आदर नाही. तुमच्यात जर हिंमत असेल तर सावरकरांना भारतरत्न द्या. सावरकर गौरव यात्रा काढायला आमचा विरोध नाही, आम्हाला सर्व महापुरुषांबद्दल आदर, त्यांच्यासमोर नतमस्तक आहोत, पण महाराष्ट्रातील याआधीच्या राज्यपालांनी व भाजप नेत्यांनी या आधी महापुरुषांविरोधात वक्तव्य केले. शिवाजी महाराज आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा अपमान केला, छत्रपतींचा अपमान होताना तुमची दातखिळी बसली होती का?

शेतकऱ्यांची थट्टा सुरू

अजित पवार म्हणाले की, राज्य सरकार हे शेतकऱ्यांची थट्टा करते आहे. आम्ही प्रत्येक वंचिताच्या मागण्यासाठी आवाज उठविण्याचा प्रयत्न केला. मात्र सरकारकडून शेतकऱ्यांसाठी काहीच निर्णय घेण्यात आला नाही. शेतकऱ्यांचया मागण्यासाठी हे सरकार नमले नाही असा आरोपही अजित पवारांनी केला आहे. अवकाळी आणि पीक विम्याचे पैसे अजूनही शेतकऱ्यांना मिळाले नाही. या सरकारचा पायगुण चांगला नसल्याने राज्यातील उद्योग बाहेर जात आहेत.

मराठवाड्यासाठी वेळ नाही

अजित पवार म्हणाले की, महाविकास आघाडी सर्वच निवडणुकीत आपल्या विचारांचे लोकप्रतिनिधी निवडून येण्यासाठी प्रयत्न करतील. प्रबोधनकार ठाकरेंनी शिवसेना नाव दिले, ते बाळासाहेब ठाकरेंनी धनुष्यबान चिन्हासह महाराष्ट्रभर पोहचविले. कायद्याचा आणि घटनेचा आदर सर्वांनी केला पाहिजे. त्यांला तिलांजली देण्याचे काम केले. आणि महाराष्ट्रातील सरकार पाडण्यात आले. असे जर सर्व राज्यात घडले तर देशात स्थिरता येणार नाही.

विकासासाठी स्थिर सरकार हवे

अजित पवार म्हणाले की, राज्याच्या विकासासाठी स्थिर सरकार हवे. शिंदे- फडणवीस सरकारने मराठवाड्यातील जनतेचा अपमान केला आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनासाठी केवळ 13 मिनिटे वेळ दिला. ज्यांनी मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या लढयात नेतृत्व केले असतील त्यांची जाणीव ठेवली पाहिजे. मात्र, राज्य सरकारने प्रतिसाद दिला नाही.

संपूर्ण राज्यात सभा घेणार

अजित पवार म्हणाले की, महाविकास आघाडीचे सरकार असताना उद्धव ठाकरेंनी आम्हाला एकत्र आलो तेव्हाच अशी सभा घेऊ असे सांगितले. मात्र आता ही पहिली सभा छत्रपती संभाजीनगरात घेण्यात आली आहे. अशा सभा आपण संपूर्ण राज्यात घेणार आहोत.

सरकारला चोर म्हटले तर घरी पोलिस येतात - धनंजय मुंडेंचा घणाघात

धनंजय मुंडे म्हणाले, मराठवाड्याच्या मातीतून वज्रमुठ आवळली जाते. मविआ एकत्रित लढणार आहे. सत्ताधाऱ्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. सरकारचे काम महाराष्ट्राचा विकास करणे, अर्थसंकल्पातील आश्वासने पाळण्याचे काम सरकारचे आहे पण दिलेले शब्द पाळले जात नाही.

..तर मातीत गाडू

धनंजय मुंडे म्हणाले की, सरकारला चोर म्हटले तर सदस्यत्व रद्द होते. घरी पोलिस येतात, राहत इंदोरी यांनीही सरकारला चोर म्हटले तर त्यांच्या घरी पोलिस आले होते. महाराष्ट्रातील सरकार गुजरातसाठी की, महाराष्ट्रासाठी? महाराष्ट्राकडे वाकड्या नजरेने बघणाऱ्यांना मातीत गाडू.

कधी सदस्यत्व जाईल नेम नाही

धनंजय मुंडे म्हणाले की, छत्रपती संभाजीनगरमधील वज्रमुठ सभेत राष्ट्रवादीचे काँग्रेसचे नेते आमदार धनंजय मुंडे यांनी भाजपवर हल्ला चढवला. दिल्लीश्वराला गाडायची ताकद मराठवाड्याने दाखवली असल्याचे ते म्हणाले. सभेला घाबरून भाजप शिंदे गटाकडून सावरकर गौरव यात्रा सुरु असल्याचे म्हणाले. सरकारला चोर म्हटल्यास कधी सदस्यत्व जाईल याचा नेम नसल्याचे ते म्हणाले. या राज्याला आणि देशाला जर कुणी खऱ्या अर्थाने मुर्ख बनवलं असेल तर ते भाजपच्या कमळाने बनवले अशी टीका राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी केली.