आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपमुख्यमंत्र्यांना अडवले:कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांनी अडवला अजित पवारांचा ताफा, ताफ्यासमोर झोपले; कर्मचाऱ्यांवर पोलिसांचा सौम्य लाठीमार

बीड2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धनंजय मुंडे यांनी आंदोलकांना बाजुला करण्याचा प्रयत्न केला
  • बीड मधील कोरोना संख्या कमी करण्यासाठी अजित पवारांनी सूचना दिल्या

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्यासोबत राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे आणि बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडेदेखील आहेत. दरम्यान, बीडमध्ये कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांकडून अजित पवारांचा ताफा अडवण्यात आला. यावेळी या कर्मचाऱ्यांवर पोलिसांना सौम्य लाठीचार्जही करावा लागला.

मिळालेल्या माहितीनुसार, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आरोग्यमंत्री राजेश टोपेसह बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत. बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आढावा बैठक घेऊन ते उस्मानाबादकडे निघाले असतानाच आरोग्य कर्मचाऱ्यांनी त्यांचा ताफा अडवला. कंत्राटी कर्मचाऱ्यांकडून अजित पवारांच्या गाडीसमोर झोपण्याचा प्रयत्नही झाला. कंत्राटी कर्मचारी पवारांच्या गाडीसमोर येताच पालकमंत्री धनंजय मुंडे गाडीमधून बाहेर उतरले आणि आंदोलकांना बाजुला करण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान, पोलिसांना या आंदोलकांवर सौम्य लाठीचार्जही करावा लागला. यात महिला आरोग्य कर्मचाऱ्यांना मारहाण झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. कोरोना काळात जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवेत घ्या अशी मागणी या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी केली आहे.

बैठकी दरम्यान तरुणाची घोषणाबाजी
पवारांनी बीड जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन खरीप हंगामाचा आणि जिल्ह्यातील कोविड परिस्थितीचा आढावा घेतला आणि त्यानंतर बैठक घेतली. अजित पवार यांच्या आढावा बैठकीस पालकमंत्री धनंजय मुंडे, आरोग्यमंत्री राजेश टोपे हे देखील उपस्थित होते. बीड मधील कोरोना संख्या कमी करण्यासाठी अजित पवारांनी सूचना दिल्या. अजित पवारांच्या बैठकीदरम्यान मराठा समाजातील तरुणांनी आरक्षणासाठी घोषणाबाजी केली.

बातम्या आणखी आहेत...