आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्पर्धा:आकांक्षा, धनंजय, शीला, प्रफुल्लने जिंकले सुवर्णपदक

औरंगाबाद8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

एनआयएमएतर्फे आयोजित डॉक्टर स्पोर्ट््स कार्निव्हल स्पर्धेत विविध मैदानावर आयोजन केले होते. सहा क्रीडा प्रकारातील स्पर्धेत एकूण १२५ डॉक्टरांनी सहभाग नोंदवला होता. समाजाबरोबर डॉक्टरांनी स्वत: निरोगी, तणावमुक्त राहण्यासाठी या स्पर्धा घेण्यात आला. विजेत्या व उपविजेत्या खेळाडूंना आयएमएचे अध्यक्ष डाॅ. सचिन फडणीस, सचिव डाॅ. उज्ज्वला दहिफळे, कोशाध्यक्ष डाॅ. विकास देशमुख, क्रीडा प्रमुख डॉ. वंदना काबरा यांच्या हस्ते बक्षीस प्रदान केले. बिपिन राठोड यांनी या स्पर्धेला सहकार्य केले. बुद्धिबळमध्ये डॉ. शीला खंडेलवाल, शीतल सोळंके, रूपाली पानसे, सुरेश रावते, मंगेश कदम, सय्यद मुदस्सीर, दिलीप देशपांडे व सायकलिंगमध्ये डॉ. संगीता पापीनवार, प्रफुल्ल जटाळे, अभिषेक राठी, सुनील देशमुख, आशिष कोठारी विजेते ठरले.

विजेते खेळाडू पुढीलप्रमाणे बॅडमिंटन - डॉ. आकांक्षा खंबायते, बेनझीर जाधव, रेणुका देशपांडे, आरती मांगूळकर, एम.डी. सादिक, वंदना काबरा, विजय जाधव, धनंजय खटावकर, विद्यानंद देशपांडे, प्रणव काबरा, रोहित बंग, प्रशांत मिश्रा, जितेश कुलकर्णी, अनंत कडेठाणकर, विकास देशमुख, रमेश सातारकर. कॅरम - डॉ. अपर्णा देशमुख, प्रार्थना शाह, प्रतिभा शितोळे, खुशबू कासट, संजीवनी भोसेकर.

बातम्या आणखी आहेत...