आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोफत शिक्षणासाठी MIMचे प्रयत्न:अकरबरुद्दीन ओवैसी 12 मे रोजी औरंगाबादेत येणार; ''आ रहा हूं मै'' खासदार इम्तियाज जलील यांची फेसबुक पोस्ट

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

एमआयएमचे नेते अकरबरुद्दीन ओवैसी औरंगाबाद दौऱ्यावर येत आहेत, ''आ रहा हूं मै'' अशी फेसबूक पोस्ट करुन औरंगाबादचे एमआयएम नेते आणि खासदार इम्तियाज जलील यांनी केली आहे. ही पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे.

एमआयएम नेते अकरबरुद्दीन ओवैसी यांच्या औरंगाबाद दौऱ्यात त्यांच्या हस्ते नकीब-ए-मिल्लत एज्युकेशनची पहिली शाखा सुरू होणार आहेत. वंचित मुलांसाठी हि मोफत शाळा असल्याची माहिती खासदार जलील यांच्यामार्फत देण्यात आली आहे. हिमायतबागच्या मागे 12 मे 2022 रोजी संध्याकाळी 4.00 वाजता या शाळेच्या भूमीपुजनाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

काय आहे खासदार इम्तियाज जलील यांची पोस्ट?

औरंगाबादचे एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी फेसबुक पोस्ट केली आहे. यात आ रहा हूं औरंगाबाद, असे म्हणत इम्तियाज यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, मला हे जाहीर करताना आनंद होत आहे, एमआयएमचे ज्येष्ठ नेते, आमदार आणि संस्थापक अध्यक्ष सालार-ए-मिल्लत एज्युकेशनल ट्रस्ट, हबीब-ए-मिल्लत जनाब अलहाज अकबरुद्दीन ओवेसी नकीब-ए-मिल्लत एज्युकेशनलच्या पायाभरणीसाठी औरंगाबाद येथे येणार आहेत.

ओवेसी हैदराबादमध्ये 11 मोफत शाळा चालवतात आणि सर्व खर्च स्वतः उचलतात. त्यांचा शैक्षणिक आणि धर्मादाय ट्रस्ट या शाळांचे व्यवस्थापन करतो जे हजारो मुली आणि महिलांना मोफत व्यावसायिक प्रशिक्षण देण्यासोबतच हजारो मुलांना मोफत शिक्षण देत आहेत. ओवेसी स्कूल ऑफ एक्सलन्सची महाराष्ट्रातील पहिली शाखा औरंगाबादमध्ये असेल, अशी माहितीही त्यांनी या पोस्टद्वारे दिली आहे.

औरंगाबादेत राजकीय नेत्यांचे दौरे सुरूच

एकीकडे राज्यात हनुमान चालिसा, भोंगा प्रकरणावरून वाद, आणि महाआरती सुरू असताना एमआयएमकडून औरंगाबादेत रोजगार मेळावा आणि वंचिताना मोफत शिक्षण मिळावे यासाठी शाळेचे भूमिपूजन करण्यात येत आहे.

औरंगाबादेत काही दिवसांपूर्वीच राज ठाकरेंचा दौरा झाला आणि आता अकरबरुद्दीन ओवैसी हे औरंगाबादच्या दौऱ्यावर येत आहे. औरंगाबादच्या दोन्ही नेत्यांच्या दौऱ्याची चर्चा महाराष्ट्रभरात सुरू आहे. आता अकरबरुद्दीन ओवैसी काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

बातम्या आणखी आहेत...