आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तडकाफडकी निलंबन:आखाडा बाळापूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवीकांत हुंडेकर तडकाफडकी निलंबित, पोलिस उपमहानिरीक्षकांनी काढले आदेश

हिंगोली3 महिन्यांपूर्वीलेखक: मंगेश शेवाळकर
  • कॉपी लिंक
  • या आदेशामुळे परिक्षेत्रीय पोलिस दलात मोठी खळबळ उडाली आहे.

कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर परिसरात सुरु असलेल्या अवैध व्यवसायाकडे दुर्लक्ष करणाऱ्या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रवीकांत हुंडेकर यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले असून त्यांच्या निलंबनाचे आदेश नांदेड परिक्षेत्राचे पोलिस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी यांनी सोमवारी ता. 26 रात्री उशीरा काढले आहे. या आदेशामुळे परिक्षेत्रीय पोलिस दलात मोठी खळबळ उडाली आहे.

आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यांतर्गत शेवाळा शिवारात अवैध व्यवसाय सुरु असल्याची माहिती पोलीस अधिक्षक कार्यालयास मिळाली होती. त्यावरून पोलिस अधिक्षक राकेश कलासागर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस अधिक्षक यतीश देशमुख यांच्या पथकाने रविवारी ता. 25 सायंकाळी छापा टाकून 4.87 हजार रुपयांचा ऐवज जप्त केला. या प्रकरणी सात जणांवर आखाडा बाळापुर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.

या प्रकरणात पोलिस अधिक्षक कलासागर यांनी सहाय्यक पोलिस निरीक्षक रवीकांत हुंडेकर यांचा कसुरी अहवाल सादर केला होता. त्या अहवालावरून हुंडेकर यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. याबाबतचे आदेश नांदेड परिक्षेत्राचे पोलिस उपमहानिरीक्षक निसार तांबाळी काढले आहेत.

आखाडा बाळापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत मोठ्या प्रमाणावर अवैध व्यवसाय चालतात, तसेच वाहनांवर जुगार खेळणारे येतात याची माहिती स्थानिक पोलिस अधिकाऱ्यांना मिळत नाही यामुळे पोलिस अधिकाऱ्यांचा निष्काळजीपणा असल्याचे स्पष्ट होतो असेही या आदेशात नमुद केले असून त्यांना पोलिस नियंत्रण कक्ष हे मुख्यालय देण्यात आले आहे.

दरम्यान, मागील पंधरवड्यात नांदेड परिक्षेत्रात हिंगोली, नांदेड, परभणी, लातुर या जिल्हयांमधून एकाच वेळी अवैध व्यवसायावर कारवाई झाल्यानंतर पुन्हा काही ठिकाणी अवैध व्यवसाय सुरु झाले होते. मात्र आता या कारवाईमुळे परिक्षेत्रातील ठाणेदार व बीट जमादारांचे धाबे दणाणले आहे.

बातम्या आणखी आहेत...