आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशिक येथे होणार असल्याची घोषणा साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी शुक्रवारी औरंगाबादेतील पत्रकार परिषदेत केली. संमेलन २०२०-२१ मार्च महिन्याच्या अखेरीस होईल. निश्चित तारखा नाशिकमध्ये होणाऱ्या बैठकीत चर्चा करून जाहीर करण्यात येतील, असे ठाले म्हणाले.
दरम्यान, शरद पवार यांच्या सहस्रचंद्र दर्शनाचे आयोजन या संमेलनात होणार असल्याची चर्चा आहे. याविषयी विचारले असता, अद्याप तशी कोणतीही माहिती माझ्याकडे नाही. काही मागणी आल्यास पाहू, असे ठाले पाटील म्हणाले. तसेच पुढचे साहित्य संमेलन विदर्भात घेण्यासाठीचा प्रस्ताव आल्याचेही ठाले पाटील म्हणाले. ज्या नेत्यांचे ठाले पाटील यांनी ‘सरहद’ संस्थेशी नाव जोडले, त्या पंतप्रधान मोदी व गडकरी यांच्याबद्दल ठाले पाटील यांनी संयोजकांबद्दल दिलगिरी व्यक्त केली असती तर जास्त उचित ठरले असते, असे सरहद्द संस्थेने दिलेल्या खुलासा पत्रात डॉ. अमोल देवळेकर आणि अविनाश चोरडिया मुख्य संयोजक यांनी म्हटले आहे.
...तर शरद पवार व्यासपीठावर का?
शरद पवार यांच्या सहस्रचंद्र दर्शनाचे आयोजन या संमेलनात होणार असल्याची चर्चा आहे. याविषयी विचारले असता, अद्याप तशी कोणतीही माहिती माझ्याकडे नाही. त्यासंदर्भात काही मागणी आल्यास पाहू, असे ठाले पाटील म्हणाले. तर राजकीय मंडळी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर नसावी या प्रस्तावाविषयी विचारले असता ठाले पाटील म्हणाले की, साहित्य मेळाव्यात राजकीय व्यक्ती व्यासपीठावर आली की त्यांचाच उदोउदो होतो. यापूर्वी यशवंतराव चव्हाण आणि शरद पवार संमेलनात आले आहेत. उस्मानाबाद येथील साहित्य संमेलनात अमित देशमुख, आळंदी येथील संमेलनात विलासराव देशमुख, गोपीनाथ मुंडेदेखील समोर बसले होते. फक्त उस्मानाबाद येथील संमेलनात सुशीलकुमार शिंदे यांचा अपवाद वगळता स्टेजवर कुणीही येण्याचा आग्रह धरला नव्हता. राजकीय मंडळी साहित्यप्रेमी, वाचक म्हणून समोरही बसू शकतात, असे स्पष्टीकरण या वेळी ठाले पाटील यांनी दिले.
...अन् सरहद्दची संधी हुकली
दिल्लीच्या मराठी संस्थांनी एकदा त्यांना दिलेले व त्यांनी स्वत:हून नाकारलेले साहित्य संमेलन पुन्हा दिल्लीला व्हावे, अशी मागणी गेले काही दिवस पुण्याच्या सरहद्द संस्थेने दिल्लीसाठी दिलेल्या निमंत्रणाचा आधार घेतला होता. परंतु तो त्यावेळी संजय नहार यांनी नाकारला आणि दिल्लीकरांची विशेष साहित्य संमेलनाची संधी हुकली. दरम्यान दिल्लीचा आग्रह धरून बसणारे लोक नरेंद्र मोदी आणि नितीन गडकरी यांच्या जवळचे असल्याचा उल्लेख आला होता. त्यामुळे विपरित वाटण्याची शक्यता गृहित धरून दोन्ही मान्यवरांचे नाव जोडल्याबद्दल ठाले पाटील यांनी दिलगिरी व्यक्त केली.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.