आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुप्तधन:कथित गुप्तधनासाठी आलेली अकोल्याची टोळी जिंतूरात जेरबंद, नऊ जणांना 3 दिवसाची कोठडी

परभणीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

एका व्यापाऱ्याच्या बोलावण्यावरून जिंतूर तालुक्यातील एका गावातील जमिनीमधील कथित गुप्तधन काढण्यासाठी शहरात आलेल्या आलेल्या टोळीला पोलिसांनी अटक करून मंगळवारी (ता.१८) न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने मांत्रिक व सदर व्यापाऱ्यासह नउ जणांना तीन दिवसांसाठी पोलीस कोठडीत रवानगी केली.

जिंतूर शहरातील एका व्यापाऱ्याने जिंतूर जवळील देवगाव परिसरात गुप्तधन असल्याच्या कथित माहितीनुसार अकोला येथून बोलाविलेली मांत्रिकांची टोळी सोमवारी (ता.१७) पहाटेच्या सुमारास एका वाहनाने शहरात दाखल झाली होती .यावेळी गस्तीवर असलेले फौजदार रवि मुंडे व त्यांच्या सहकारी पोलिस कर्मचाऱ्यांनी त्यांच्या संशयास्पद हालचालीवरून वाहनाची तपासणी केली. त्यात जमीन खोदण्यासाठीचे व पुजेचे साहित्य आढळून आले . त्यामुळे मांत्रिकासह त्यांच्या सहकाऱ्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता सर्व प्रकार उघडकीस आला.

यासंदर्भात पोलिस कर्मचारी अनिल इंगोले यांच्या फिर्यादीवरून रात्री उशिरा पोलिस ठाण्यात जिंतूरातील व्यापारी अब्दुल रज्जाक,जफर अली व मांत्रिक रमेश जंजाळ, वाहन चालक अश्र्विन नेमाडे, तुषार रोकडे,दिलीप आढाव,शुभम पाटील,करण ठाकूर, मोहंमद इब्राहिम (सर्व रा.अकोला) यांच्या विरुद्ध जादूटोणा कायद्या अंतर्गत विविध कलमान्वये गुन्हे दाखल करून दुसरे दिवशी (ता.१८) सर्व संशयितांना न्यायालयात उपस्थित केले असता न्यायालयाने त्यांची २० आगस्टपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी केली. पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड सदरील प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...