आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

STI परिक्षेत औरंगाबादचा झेंडा:लाडसावंगीचा अक्षय पडूळ राज्यात प्रथम, चितेगावचा कृष्णा क्षीरसागर 41 वा, बीडची कल्पना मुंडे 43 वी

औरंगाबाद10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) वतीने जुलै 2022 मध्ये घेण्यात आलेल्या विक्रीकर निरीक्षक (एसटीआय) परीक्षेत औरंगाबादचा अक्षय दीवानराव पडूळ हा विद्यार्थी राज्यात प्रथम आला आहे.

जुलै 2022 मध्ये झाली परिक्षा

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने विक्रीकर निरीक्षक या पदाची जाहिरात सन 2021 मध्ये प्रकाशित झाली होती. या पदासाठी प्रत्यक्ष परीक्षा जुलै 2022 मध्ये घेण्यात आली. या परीक्षेचा निकाल बुधवारी घोषित करण्यात आला. या परीक्षेत सर्वप्रथम येण्याचा मान औरंगाबाद तालुक्यातील लाडसावंगी येथील शेतकरी कुटुंबातील अक्षय पडूळ याने मिळवला आहे.

यांचेही यश

विक्रीकर निरीक्षक पदाच्या या परीक्षेत अक्षय या विद्यार्थ्याबरोबरच औरंगाबादमधील चित्तेगाव येथील राहणारा कृष्णा प्रकाश क्षीरसागरचा 41 वा रँक आला आहे. पुर्णा येथील विलास रावसाहेब भोसले 141 वा रँक मिळवत यशस्वी ठरला आहे. पालम येथील चंद्रकांत सोनटक्केने देखील परीक्षेत यश मिळवले आहे. तर बीड येथील कल्पना मुंडे हिने 43 वा रँक मिळविला आहे.

प्रयत्न करा सातत्य ठेवा - अक्षय पडूळ

''आज निकाल आला खूप आनंद झाला. हा मेन्सचा माझा पहिलाच अटेंप्ट होता. आपल्या आई-वडिलांनी आपल्यावर दाखवलेला विश्वास सार्थ ठरला. माझ्या कुटुंबिंयानी मला खूप साथ दिली.''

घरातील पहिलाच पदवीधर

दिव्य मराठीशी बोलतांना अक्षयने सांगितले की, ''मी शेतकरी कुटुंबातला घरातला पहिलाच पदवीधर माझी शिक्षणा प्रती असलेली आवड आणि मेहनतीची तयारी पाहून मला आई-वडिल नेहमीच म्हणायचे आपल्या गावाच आणि घराच नाव मोठ कर खूप शिकून मोठा हो आज आपण हे करु शकलो याचा खूप आनंद होतोय. माझे शालेय शिक्षण पाचवी ते दहावीपर्यंत नवोदय विद्यालयात झाले. तर बीएससीची पदवी मी विवेकानंद महाविद्यालयातून पूर्ण केली.''

हताश होवू नका, आत्मविश्वासाने सामोरे जा

अक्षय पडूळ म्हणाला, ''2018 पासून स्पर्धा परीक्षेच्या तयारीला लागलो. आता एमपीएससीच्या मेन्सची देखील तयारी सुरु आहे. मी सुरुवातीपासूनच परीक्षेच्या तयारीत नियोजन आणि सातत्य ठेवून अभ्यास केला. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणांना एव्हढेच सांगेल की सातत्य आणि मेहनतीची, प्रयत्नांची तयारी ठेवा. काहीवेळा निराशाही होते. मनाप्रमाणे निकाल आला नाही तर ताणही येतो. त्यामुळे हताश होवू नका. आत्मविश्वासाने सामोरे जा.''

बातम्या आणखी आहेत...