आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा९४.३ माय एफएमच्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त माय एफएम आणि अरिहंत होंडाच्या वतीने ‘माय एफएम का सिक्सर’ सिक्स अ साइड बॉक्स क्रिकेट लीगचे आयोजन केले होते. सहप्रायोजक महावीर ज्वेलर्स, एल.जी इलेक्ट्रोनिक्स, पर्ल एज्युकेशन, राजदरबार मेन्स वेअर, साई न्यूरोसिटी मल्टिस्पेशालीटी हॉस्पिटल आणि संकल्प स्पोर्ट्स क्लब, तर आऊटडोअर पार्टनर मीडिया हाऊस होते. या लीगमध्ये प्रत्येक सामना चुरशीचा झाला. दोन दिवस चाललेल्या या उपक्रमात १६ संघांनी भाग घेतला होता. साखळी पद्धतीच्या सामन्यानुसार उपउपांत्य फेरी, उपांत्य फेरी आणि अंतिम फेरी असे सामने खेळवले. यात अलाॅफ्ट एनएक्स विरुद्ध स्ट्रीट क्लासिकमध्ये झालेल्या अंतिम सामन्यात अलाॅफ्ट एनएक्सने बाजी मारली. त्यांना ५१ हजार रोख आणि ट्रॉफी देण्यात आली.
उपविजेते स्ट्रीट क्लासिकला ट्रॉफी दिली. राजदरबार मेन्स वेअर उस्मानपुरातर्फे सर्वाधिक २०९ धावा काढणारा बेस्ट बॅट्समन अरीब काझीला ऑरेंज कॅप आणि ५ हजार रोख बक्षीस देण्यात आले. ६ विकेट्स घेणाऱ्या बेस्ट बॉलर साहिल खानला पर्पल कॅप आणि ५ हजारांचे रोख बक्षीस दिले. २०८ धावा, २ विकेट्स आणि तीन कॅचेससह मॅन ऑफ द सिरीज ठरलेल्या सय्यद सद्दामला पाच हजारांचे रोख बक्षीस देण्यात आले. या लीगचे सर्व सामने नॉकआऊट होते. या १६ संघांतून सेमी फायनलसाठी स्ट्रीट क्लासिक विरुद्ध फाइन हीरोज, तर दुसरीकडून अलाॅफ्ट एन. एक्स विरुद्ध एम.आर. सेव्हन हे चारही संघ पोहोचले होते. या वेळी माजी रणजी खेळाडू तथा महाराष्ट्राचे उत्कृष्ट क्रिकेट प्रशिक्षक दिनेश कुंटे, अनंत नेरळकर, विनोद माने उपस्थित होते.
यात ग्रुप एमधून साई न्यूरोसिटी हॉस्पिटल, अरिहंत रेड विंग, माय एफएम वीर, पर्ल एज्युकेशन, स्ट्रीट क्लासिक, आर.के. बिल्डर्स, जबरे हनुमान क्रिकेट क्लब आणि फाइन हीरोज, तर ग्रुप बीमधून डकस्टर्स, एम. आर. सेव्हन, अलाॅफ्ट एनएक्स, टीम मेडिकव्हर, एन. के वाॅरियर्स, सिटी स्ट्रायकर्स, छत्रपती क्रिकेट क्लब आणि एल.जी. वाॅरियर्स आदींनी सहभाग घेतला होता. स्टेशन हेड नितीन लोखंडे, आरजे प्रेषित, आरजे आकांक्षा, आरजे रसिका आणि संपूर्ण माय एफएम टीमने सर्वांचे आभार मानले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.