आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नात्याला काळिमा फासणारी धक्कादायक घटना:मद्यपी बापाचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार

खुलताबाद21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील एका गावात बाप-लेकीच्या नात्याला काळिमा फासणारी धक्कादायक घटना घटना घडली. मद्यपी बापाने नशेत आपल्या पोटच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला. अत्याचार करून पळून जात असलेल्या बापाला खुलताबाद पोलिसांनी पकडले असून संतोष सोनवणे असे आरोपी मद्यपी बापाचे नाव आहे. आरोपीवर बलात्कारासह पोक्सोअंतर्गत खुलताबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मद्यपी बापाला अटक करण्यात आली आहे. ३५ वर्षीय आराेपीला चार मुली असून एक मुलगा अशी एकूण पाच मुले आहेत. आरोपी हा वीटभट्टी कामगार असून तो पत्नी-मुलांसह कागजीपुरा येथील एका वीटभट्टीवर विटा थापण्याचे काम करत होता. वीटभट्टीचे सध्या काम बंद झाले असल्याने आरोपी हा सध्या ट्रॅक्टरवर मातीकाम करत आहे.

आरोपीने बुधवार रोजी रात्री दररोजप्रमाणे दारू पिऊन घेतली व पोटच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्याचा प्लॅन आखला. त्याने १६ वर्षीय मुलीला वीटभट्टीवर सामान आणण्यासाठी नेण्याचा बहाणा करत बराेबर नेले. तेथे नेऊन मुलीला मारहाण करत तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर तिला कागजीपुरा येथे नातेवाइकांकडे साेडले व ताे तेथून निघून गेला. ताे गावात एका समाजमंदिरात जाऊन झाेपला. मुलीने सकाळी उठून नातेवाइकांना घडलेला प्रकार सांगितला. नातेवाइकांनी त्या नराधाम बापाचा शाेध सुरू करत पाेलिसांना खबर दिली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले व मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून त्याच्यावर बलात्कारासह पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करून त्यास गजाआड केले. याप्रकरणी पुढील तपास पोलिस करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...