आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Aurangabad
  • Ali, Who Arrived From Yemen 12 Years Ago On A Tourist Visa, Never Returned Home; Fake Voting, Aadhaar And PAN Card Holder Finally Arrested News And Updates

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

औरंगाबाद:टुरिस्ट व्हिसावर १२ वर्षांपूर्वी येमेनहून आलेला अली मायदेशी परतलाच नाही; बनावट मतदान, आधार आणि पॅन कार्ड करून राहणारा अखेर अटकेत

औरंगाबाद19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • रेकॉर्ड तपासताना विशेष पथकाच्या आले लक्षात

येमेनवरून १२ वर्षांपूर्वी औरंगाबादला टुरिस्ट व्हिसावर आईसोबत आजोळी आलेला एक तरुण अजूनही शहरातच बेकायदेशीरपणे राहात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस अाला. त्याने येथे चक्क स्वत:चे बनावट आधार कार्ड, पॅन कार्ड व मतदान कार्डदेखील तयार करून घेतले आहे. अली मोहंमद आवाध बिन हलाबी (३०) असे या तरुणास पोलिसांनी अबरार कॉलनीतून अटक केली. अली मोहंमद याची आई मूळ औरंगाबादची आहे. तिचा विवाह ३१ वर्षांपूर्वी मूळ येमेन येथील अलीच्या वडिलांसोबत झाला होता.

अलीच्या जन्माच्या काही वर्षांनी त्याचे वडील सौदी अरेबियाला निघून गेले. अली २०१२ मध्ये आईसोबत टुरिस्ट व्हिसावर औरंगाबादेत आला. काही महिन्यांनंतर त्याची आई येमेनला गेली पण अली इथेच आजोबाकडे राहिला. त्याने स्थानिक तरुणीसोबत विवाहदेखील केला. त्यांना एक मुलगा व एक मुलगी अाहे. पाेलिसांनी त्याच्या घराची झडती घेतली असता बनावट अाेळखपत्रे अाढळून अाली. २६ मे २०१२ ते २६ जून २०१२ पर्यंतचा त्याचा व्हिसा होता. आणखी येमेनचे तीन नागरिक व्हिसाची मुदत संपल्यानंतरही वास्तव्य करत असल्याचेही समोर आले आहे. मात्र, नोटीस बजावली.

रेकॉर्ड तपासताना विशेष पथकाच्या आले लक्षात
विदेशी नागरिकांचे रेकॉर्ड पोलिस आयुक्तालयातील विशेष शाखेतर्फे तपासले जाते. २०१२ मध्ये आलेला एक जण अवैधरीत्या शहरातच वास्तव्य करत असल्याची माहिती समोर आली. सहायक आयुक्त अशोक बनकर यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक प्रमोद खटाने, उपनिरीक्षक सी. व्ही. ठुबे, अंमलदार मच्छिंद्र जाधव यांच्या पथकाने अलीचा शोध सुरू केला. बीड बायपास येथील अबरार कॉलनीत तो राहत असल्याचे समजताच त्याला ताब्यात घेतले.

बातम्या आणखी आहेत...