आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

पैठण:जायकवाडी धरणाचे सर्व 27 दरवाजे उघडले, 94 हजार 320 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू, पात्रानजीक राहणाऱ्या लोकांना सतर्कतेचा इशारा

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • शुक्रवारी पहाटे पाचच्या सुमारास 94 हजार क्युसेक विसर्ग सुरु करण्यात आला आहे.

पैठणच्या जायकवाडी धरणाचे सर्व 27 दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्यामुळे गोदावरी पात्रानजीक राहणाऱ्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. त्याबरोबरच नदीपात्रामध्ये मालमत्ता, चीज वस्तु, वाहने, जनावरे, पाळीव प्राणी, शेती अवजारे इतर साधने सुरक्षित ठिकाणी हलविण्यात यावे आणि नदीपात्रात कोणीही जाऊ नये असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

दरम्यान धरणातून गोदावरी नदी पत्रात 94 हजार 320 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. जायकवाडी धरणाचे सर्व 27 दरवाजे उघडण्यात आले आहेत. हे दरवाजे 2 ते 4 फुटाने उघडून विसर्ग सुरू करण्यात आला आहे. धरणाचे 10 ते 27 दरवाजे चार फुटाने उघडण्यात आले. तर 1 ते 9 दरवाजे दोन फुटांनी उघडण्यात आले आहेत. शुक्रवारी पहाटे पाचच्या सुमारास 94 हजार क्युसेक विसर्ग सुरु करण्यात आला आहे.