आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अधिसभा निवडणूक:अधिसभेच्या चार गटांतून 121 जणांचे, विद्या परिषदेसाठी सर्व 38 अर्ज वैध

औरंगाबाद4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील अधिसभेच्या दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकीसाठी चार गटात एकूण १२१ उमेदवारांचे अर्ज वैध तर १३ जणांचे अर्ज अवैध झाले आहेत, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा कुलसचिव डॉ.भगवान साखळे यांनी दिली. तर विद्या परिषदेच्या जागांसाठी दाखल सर्व ३८ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले.

पहिल्या टप्प्यात पदवीधर प्रवर्गातून १० जागांची निवडणूक २६ नोव्हेंबर रोजी होणार आहे. तर दुसऱ्या टप्प्यात अधिसभेच्या २९ जागांसाठी उर्वरित गटातून मतदान घेण्यात येणार आहे. यामध्ये प्राचार्य व महाविद्यालयीन प्राध्यापक गटातून दहा जागांसाठी तर संस्थाचालक गटातून सहा व विद्यापीठ शिक्षकातून ३ जागासाठी तसेच विद्या परिषदेच्या आठ जागांसाठी मतदान होणार आहे. १९ नोव्हेंबर अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस होता. १० डिसेंबर रोजी मतदान तर १३ डिसेंबर रोजी मतमोजणी होईल. अधिसभेसाठी एकुण १३४ अर्ज दाखल झाले आहेत. यामध्ये महाविद्यालयीन शिक्षक ८५ (वैध ७८, अवैध १३), संस्थाचालक १३ (वैध १२, अवैध १) प्राचार्य २३ (वैध १९, अवैध ४) , विद्यापीठ शिक्षक १३ (वैध १२, अवैध १) याप्रमाणे अर्ज दाखल झाले आहेत.

२७ नोव्हेंबर रोजी अर्ज मागे घेता येणार दुसऱ्या टप्प्यातील अधिसभेच्या निवडणुकीसाठीची तसेच विद्या परिषदेच्या उमेदवारांची वैध- अवैध उमेदवारांची यादी मंगळवारी रात्री जाहीर झाली. त्यावर आक्षेप दाखल करण्यासाठी तसेच अपिल दाखल करण्यासाठी बुधवारी (२३ नोव्हेंबर) सकाळी १०ः३० ते ५ ही वेळ देण्यात आली आहे. या अपिलांवर कुलगुरु डॉ. प्रमोद येवले हे शुक्रवारी दुपारी १२ वाजता सुनावणी घेणार आहेत. २७ नोव्हेंबर रोजी अर्ज मागे घेता येतील. याच दिवशी अंतिम यादी प्रकाशित होईल. १० डिसेंबर रोजी मतदान होणार असून १३ डिसेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...