आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिनेटच्या दहा जागांसाठी 126 अर्ज दाखल:विद्यापीठ प्रशासनाकडून आज होणार सर्व आर्जांची छाननी

औरंगाबाद24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीत पदवीधर गटातून शुक्रवारी दिवसभरात 52 अर्ज दाखल झाले असून एकूण 10 जागांसाठी 126 अर्ज प्राप्त झाले आहेत, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा कुलसचिव डॉ. भगवान साखळे यांनी दिली. या अर्जांची छाननी 5 नोव्हेंबर रोजी हाेणार आहे.

अधिसभा, विद्या परिषद व अभ्यास मंडळ आदी प्राधिकरणांच्या निवडणुकांचा कार्यक्रम कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. पहिल्या टप्प्यात पदवीधर गटातून निवडून येणाऱ्या 10 जागांची निवडणूक 26 नोव्हेंबर रोजी होणार आहे.

यात खुल्या गटातून 5, तर आरक्षित गटातून प्रत्येकी एक उमेदवार निवडून येणार आहे. 27 ऑक्टोबरपासून अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून 1 नोव्हेंबर रोजी 7 अर्ज, 2 नोव्हेंबर रोजी 38 अर्ज, शुक्रवारी सायंकाळपर्यंत एकूण 126 अर्ज दाखल झाले होते.

यात खुल्या प्रवर्गातून सर्वाधिक 64 अर्ज दाखल झाले. महिला-8 अर्ज, अनुसूचित जाती-11, अनुसूचित जमाती-7, इतर मागास वर्ग-11, भटके विमुक्त जाती-जमाती प्रवर्गातून-25 अर्ज दाखल झाले आहेत.

बातम्या आणखी आहेत...