आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आश्‍वासन:योजनेतील सर्व घरकुले पूर्ण होणार : गिरीश महाजन

औरंगाबाद25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंतप्रधान घरकुल योजना व राज्याच्या ग्रामीण गृहनिर्माण योजनांमधील सर्व लाभार्थींना घरे दिली जातील, असा दावा ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी केला. राज्य सरकारच्या दप्तर दिरंगाईमुळे ३१ डिसेंबरपर्यंत मंजुरी न मिळालेली घरकुले इतर राज्यांना दिली जाणार असल्याचे वृत्त दिव्य मराठीने ४ जानेवारीच्या अंकात प्रकाशित केले होते. त्याची दखल घेऊन महाजन म्हणाले, १४.२६ लाखांच्या उद्दिष्टापैकी १३.१४ लाख घरकुलांना मंजुरी दिली आहे. उर्वरित लाभार्थींच्या मंजुरीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. काही ठिकाणी जागेची समस्या असेल तर बहुमजली इमारती, गृहसंकुले, अपार्टमेंटद्वारे ही अडचण दूर केली जाईल.’

बातम्या आणखी आहेत...