आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात गुरूवारी (22 डिसेंबर) 73 व्या अखिल भारतीय वाणिज्य परिषदेचे उद्घाटन होणार आहे. भारताची फाईव्ह ट्रिलीयन इकॉनॉमीकडे वाटचाल यासह विविध विषयावर मंथन होणार आहे. उद्योजक, प्राध्यापक, विद्यार्थी आणि विविध कुलगुरूंसह दीड हजार प्रतिनिधी सहभागी होणार असल्याची माहिती कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी दिली आहे.
डॉ. येवले म्हणाले, ‘ 22 ते 24 डिसेंबर दरम्यान नाटयगृहासह विविध सभागृहात सात परिसंवाद होणार आहेत. सहा महिन्यांपासून या परिषदेची तयारी सुरु होती. देशभरातून 1, 547 प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. ‘रोजगार निर्मिती डिजीटल ब्रॅडींग, मानव संसाधन विकास रणनिती, सर्वसमावेशक विकास, मार्केटिंग व आंतरराष्ट्रीय व्यापार आदी विषयांवर चर्चा केली जाणार आहे. यावेळी विविध पारितोषिकांचे वितरण स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात येईल. परिषदेत ९१२ संशोधनपर लेख प्राप्त झाले आहेत. असेही कुलगुरूंनी सांगितले. परिषदेचे सचिव डॉ. वाल्मीक सरवदे म्हणाले, ‘592 पेपर्सचे प्रत्यक्ष वाचन होईल. 1 परिसंवाद, 2 स्मृती व्याख्याने होणार आहेत. यावेळी त्रिपुरा केंद्रीय विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. जी. पी. प्रसेन, इंदौर येथील प्रा. रमेश मंगल ’इंडियन कॉमर्स असोसिएशन’चे सचिव डॉ. पुष्पेंद्र मिश्रा, एमजीएम विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास सपकाळ, प्र-कुलगुरु डॉ. श्याम शिरसाठ, कुलसचिव डॉ. भगवान साखळे, ‘आयसीए’चे माजी उपाध्यक्ष प्रा. मानस पांडेय, कोषाध्यक्ष प्रा. नवल किशोर, संयोजन समिती सचिव डॉ. वाल्मीक सरवदे, समन्वयक तथा विभागप्रमुख डॉ. सय्यद अझरुद्दीन, एमजीएमचे कुलसचिव डॉ. अशिष गाडेकर, डॉ. हरिदास विधाते, डॉ. विलास इप्पर, एस. जी. शिंदे, आदींची उपस्थिती होती.
तीन विद्यापीठांच्या कुलगुरूंची उपस्थिती
नितीन गडकरी यांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन होईल. केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड, उद्योजक श्रीकांत बडवे, इंडियन कॉमर्स असोसिएशनच्या अध्यक्ष तथा भुवनेश्वर येथील किट विद्यापीठाच्या कुलगुरू प्रा. सस्मिता सामंथा, केरळ विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. एच. व्यंकटेशरलू, एमजीएमचे कुलगुरू प्रा. विलास सपकाळ, प्राचार्य टी. ए. शिवारे आदी मान्यवरांची उद्घाटकीय सत्राला उपस्थिती राहणार आहे. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. येवले असतील.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.