आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअतिवृष्टीग्रस्तांना नुकसान भरपाईसाठी शिंदे-फडणवीस सरकारने काढलेल्या आदेशात किमान ५ जाचक अटी असल्याचा आरोपवजा दावा अखिल भारतीय किसान सभेने केला आहे. शेतकऱ्यांना मदत मिळूच नये, असाच या सरकारचा प्रयत्न असल्याचेही सभेचे म्हणणे आहे. ही संघटना सातत्याने भाजपविरोधी आणि काँग्रेस-राष्ट्रवादी ला अनुकूल भूमिका मांडते, असे म्हटले जाते. सभेचे राष्ट्रीय सहसचिव डाॅ. अजित नवले यांनी पर्जन्यमापक यंत्रांच्या विश्वासार्हतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. अटी-शर्तींच्या या सरकारला फक्त घोषणांची सवय झाली आहे, असे त्यांचे म्हणणे आहे.
अतिवृष्टीग्रस्त आदेशाविषयी अटींविषयी जे सांगितले ते असे. १. सलग ५ दिवस किमान १० मिलिमीटर पाऊस झालेल्या महसूल परिमंडळातच अतिवृष्टी झाल्याचे गृहीत धरून भरपाई देण्यात येईल. २. मागील १० वर्षांत त्या परिमंडळातील सरासरी पर्जन्यमानापेक्षा ५० टक्के किंवा त्याहून अधिक पाऊस पडलेला असावा, असे बंधन आहे. ३. त्यानंतरच्या पुढील १५ दिवसांत सामान्यकृत निर्देशांक (एन.डी.व्ही.आय) तपासून तो जर नुकसानग्रस्त दर्शवित असेल, तरच ते परिमंडळ पंचनाम्यासाठी पात्र ठरेल. ४. पंचनाम्यात ३३ टक्के नुकसान दिसणे आवश्यक आहे. ५. गावाऐवजी परिमंडळ एकक ठेवले आहे. ६. पर्जन्यमापक यंत्र बसविलेल्या गावाऐवजी परिमंडळातील इतर गावात अतिवृष्टी झाली, तरीही ती गावे मदतीपासून वंचित राहतील. त्यामुळे या सरकारला शेतकऱ्यांची खरी मदत करण्याची इच्छाच नसल्याचे स्पष्ट दिसते. असे नवलेंचे म्हणणे आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.