आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रीडाजगत:डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा स्वाॅफ्टबाॅल संघ जाहीर, सुमेर सिंग पाटील संघाचा कर्णधार

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

चंदीगड (पंजाब) येथील पंजाब विद्यापीठात ५ ते ९ एप्रिलदरम्यान अखिल भारतीय आंतरविद्यापीठ सॉफ्टबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा संघ सहभागी होणार आहे. या स्पर्धेसाठी विद्यापीठाचा १६ सदस्यीय संघ रविवारी जाहीर करण्यात आला. संघ सोमवारी स्पर्धेसाठी रवाना होणार आहे.

विद्यापीठाच्या संघाचे स्पर्धापूर्व प्रशक्षिण शिबिर २८ मार्च ते २ एप्रिलदरम्यान विद्यापीठाच्या मैदानावर संघ प्रशिक्षक डॉ. पंढरीनाथ रोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. संघ व्यवस्थापक म्हणून प्रा. सत्यजित पगारे यांची विद्यापीठाच्या क्रीडा विभागातर्फे नियुक्ती करण्यात आली आहे. संघात निवड झालेल्या खेळाडूंचे छावणी एनसीसी विभागाचे राजेंद्र सिंग, विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. भगवानराव साखळे, विद्यापीठाचे प्रभारी क्रीडा संचालक डॉ. दयानंद कांबळे आदींनी अभिनंदन केले व स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

विद्यापीठाचा संघ पुढीलप्रमाणे :

विद्यापीठाच्या संघात संतोष आवचार, रोहित तुपारे, हर्षल रोकडे, रोहीत शेळके, दीपक भावकर, सुमेरसिंग पाटील (कर्णधार), अक्षय चव्हाण, आकाश राऊत, बलराम जगताप, प्रेम खंडागळे, विजय मिसाळ, यशराज वाघ, रोहित साळवे, कुणाल चव्हाण, शोएब पठाण आणि मनीष पहाडिया यांचा समावेश आहे.

संघ पहिल्या तीनमध्ये येणार :

आपल्या विद्यापीठाचा सॉफ्टबॉल संघ मजबूत आहे. संघात युवा व अनुभवी खेळाडूंचा समावेश आहे. चांगल्या सरावामुळे संघात ताळमेळ जुळून आला आहे. आपल्या विद्यापीठाचा संघ पहिल्या तीनमध्ये नक्की बाजी मारले, असा विश्वास आहे, असे मत प्रशिक्षक डॉ. पंढरीनाथ रोकडे यांनी स्पर्धेला रवाना होण्यापूर्वी व्यक्त केले.