आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करारोजगार मेळाव्यांच्या आयोजनासाठी आता जिल्हा आणि विभागीय स्तरावर प्रत्येकी ५ लाखांची आर्थिक तरतूद केली आहे. आत्तापर्यंत राज्यासाठी ३ कोटी ६१ लाखांची तरतूद केली होती. त्यापैकी १ कोटी ५१ लाख रुपये खर्च केले. आता विभागीय स्तरावर १ लाखावरून ५ लाखांची तरतूद केली आहे. कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नावीन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. विशेष म्हणजे, मुलाखतीची तयारी, बायोडेटा तयार करणे आदींचे प्रशिक्षणही बेरोजगारांना रोजगार मेळाव्यातूनच दिले जाणार आहे. उद्योग, कारखाने, खासगी आस्थापना, कॉर्पोरेट संस्थेतील रोजगार भरतीसाठी शासनाच्या कौशल्य विकास विभागामार्फत वेळोवेळी रोजगार मेळाव्यांचे आयोजन केले जाते. महास्वयंम वेबपोर्टलवर त्यासाठी युवक मोठ्या प्रमाणात नोंदणी करतात आतापर्यंत विभागीय स्तरावरील रोजगार मेळाव्याला १ लाख तर जिल्हास्तरावरील मेळाव्यासाठी ४० ते ६० हजार रुपये दिले जात होते. आता ही मर्यादा दोन्हीसाठी ५ लाख रुपये केली आहे. रोजगार मेळाव्याची माहिती प्रत्येक बेरोजगार युवक-युवतीपर्यंत आणि पालकांपर्यंत पोहोचावी म्हणून १ लाख रुपये प्रचार व प्रसिद्धीवर खर्च करण्यासही मान्यता दिल्याचे लोढा यांनी म्हटले आहे. स्वयंरोजगार इच्छुक उमेदवारांना कर्ज उपलब्ध करून देणारी विविध शासकीय महामंडळे, राष्ट्रीयीकृत तसेच खासगी बँका, वित्तीय संस्थांनाही आता रोजगार मेळाव्यात निमंत्रित केले जाईल.
यापुढेही समुपदेशन करणार
कौशल्य विकास, रोजगार व स्वयंरोजगार राबविणारे इतर शासकीय विभागांनाही सामावून घेऊन त्यांना स्टॉल्स लावता येतील. उमेदवारांना रोजगार, स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण देणे, बायोडेटा तयार करण्याच्या संदर्भात प्रशिक्षण देणे, मुलाखतीची तयारी कशी करावी याबाबतचे मार्गदर्शन, समुपदेशन करण्याचे काम यापुढे कौशल्य विकास विभागामार्फतच केले जाणार आहे. त्यासाठी होणाऱ्या खर्चाची मर्यादा आता १ लाखाहून ५ लाख केल्याचे लोढा यांनी म्हटलेे आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.