आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोल्हापूर:अख्खं कोल्हापूर 100 सेकंद थांबलं...राजर्षी शाहू महाराजांना अभिवादन

औरंगाबाद14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

वेळ सकाळी ठीक दहाची... उन्हाची किरणे अंगावर झेलत बालगोपाळांपासून ते आबालवृद्धांपर्यंत प्रत्येक जण जागच्या जागी स्तब्ध झाला. दोन्ही हात आपोआप जोडले गेले... मान झुकवून प्रत्येकाने शंभर सेकंद लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या स्मृतींना अभिवादन केले. या शंभर सेकंदांत प्रत्येकाच्या मनामध्ये राजर्षी शाहूंच्या छबीसह त्यांच्या कार्यकर्तृत्वाप्रति कृतज्ञता व्यक्त केली.

राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या स्मृतिशताब्दी कृतज्ञता पर्वाअंतर्गत शुक्रवारी (६ मे) कोल्हापुरात १०० सेकंद स्तब्ध उभे राहून लोकराजाला आदरांजली वाहण्यात आली. शाहू समाधिस्थळी आयोजित कार्यक्रमाला शाहू छत्रपती, विविध विभागांचे मंत्री, खासदार, लोकप्रतिनिधी, विविध क्षेत्रातील मान्यवर, विद्यार्थी, नागरिकांची उपस्थिती होती. शाहू मिल, नर्सरी बागेतील राजर्षी शाहू समाधी स्मारक ठिकाणी, जिल्ह्यातील सर्व शिक्षण संस्था, शासकीय कार्यालयांसह रस्त्यावर, शेतशिवारात, घराघरात शंभर सेकंद स्तब्ध होऊन कोल्हापूरकरांनी अभिवादन केले.

शाहू महाराजांना अपेक्षित असलेला समाज व राज्य निर्माण करण्यासाठी एकत्र काम करू : ठाकरे मुंबई ; ज्या वृत्तीविरोधात छत्रपती शाहू महाराज लढले, ती वृत्ती आज खरोखर संपली आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. ती वृत्ती आता जिथे जिथे जिवंत असेल तिथे तिथे लढूया व सामाजिक समता स्थापित करून छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती शाहू महाराज यांना अपेक्षित असलेला समाज व राज्य निर्माण करण्यासाठी एकत्र येऊन काम करू, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...