आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळांतर्गत गुरुवर्य लहुजी साळवे आरोग्य केंद्र आणि जीएलएसएके- स्लम हेल्थ प्रोजेक्ट यांच्यातर्फे १९९२ पासून शहरात सामुहिक डोहाळे जेवण कार्यक्रम घेण्यात येतो. आतापर्यंत ३ केंद्रातून ८१०० गर्भवतींचा असा सोहळा घेण्यात आला. कोरोना काळानंतर यावर्षी शुक्रवारी प्रथमच हा कार्यक्रम झाला. त्यात ४२ सर्वधर्मीय गर्भवतींचा सहभाग होता. यावेळी शारीरिक-मानसिक आरोग्याच्या टिप्स व सांस्कृतिक सादरीकरणातून महिलांशी संवाद साधण्यात आला.
गरोदर महिलांना विविध समस्या येतात. याविषयी नेमके कुणाला विचारावे हे कळत नाही. याकरीता कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे सविता कुलकर्णी म्हणाल्या. प्रसूतीरोग तज्ज्ञ डॉ. प्रार्थना शहा यांनी मार्गदर्शन केले. राजेंद्र राक्षे यांनी सूत्रसंचालन केले. पिराजी कमले यांनी परिचय करून दिला. मेघा जाधव यांनी आभार मानले. संस्थेचे अध्यक्ष डॉ. दिवाकर कुलकर्णी उपस्थित होते.
अशी घ्या आरोग्याची काळजी
शुगर, बीपी तपासण्या करून घ्याव्यात. {फाॅलिक अॅसिडच्या गोळ्या घ्या. { शेवटच्या तीन महिन्यात दर आठवड्याला तपासणी करा { प्रसूतीसाठी अगोदरच नाव नोंदवा { प्रसूतीनंतर २ महिन्यांनी कॉपर टी बसवा.
असे राखा मानसिक आरोग्य : { गर्भधारण काळात स्वतःला आनंदित ठेवा. { मोबाइलचा वापर कमी करा. कारण रेडिएशनचा परिणाम बाळाच्या मेंदूवर होतो. { नेहमी सकारात्मक विचार करा.
आरोग्यदायी ओटी
कॅल्शियम, फॉलिक अॅसिड, लोहयुक्त गोळ्यांनी ओटी भरून भेटवस्तू दिली. पती-पत्नीला झोपाळ्यावर बसून फोटो काढला. त्यानंतर सर्वांना बिटचे पराठे व शेंगदाण्याच्या लाडूचा अल्पोपाहार देण्यात आले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.