आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बुकिंग मिळणे दुरापास्त:सर्व विमाने हाऊसफुल्ल, कनेक्टिंगने विदेशात जाणाऱ्यांची संख्याही वाढली

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

दिवाळीपासून विमान प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. औरंगाबादहून मुंबई, दिल्ली व हैदराबादसाठी विमानाचे बुकिंग मिळणे दुरापास्त झाले आहे. विशेष म्हणजे दिल्ली, मुंबई व हैदराबाद या शहरांत जाणारे प्रवासी कनेक्टिंग फ्लाइट्स‌नी विदेशातही मोठ्या प्रमाणावर जात असल्याचे टूर्स गाइड‌्सचे निरीक्षण आहे. यात दुबई, सिंगापूर, बँकॉक, फुकेट, युरोप आदी ठिकाणांचा समावेश आहे. मुंबई, दिल्लीसाठी एअर इंडियाचे अनुक्रमे सकाळी ८.५० व ७.५० वाजता विमान आहे. ३० ऑक्टोबरपासून इंडिगोने वेळेत बदल केला. औरंगाबाद ते हैदराबाददरम्यान पूर्वी एकच विमान होते. आता इंडिगोने ७८ प्रवासी क्षमतेची दोन विमाने सुरू केली. त्याची वेळ सकाळी ८.२० वाजता व दुपारी ४.४० वाजता आहे. तसेच इंडिगोची मुंबईसाठी सकाळी ७.०५ वाजता तर दिल्लीसाठी सायंकाळी ५.४० वाजता सेवा आहे. ३० ऑक्टोबर रोजी एअर इंडियाच्या विमानाने दिल्लीहून १६५ प्रवासी शहरात आले, तर १८२ प्रवासी दिल्लीला गेले. इंडिगोने हैदराबादहून सकाळी ५७ आले तर ८१ प्रवासी हैदराबादला गेले. मुंबईहून एअर इंडियाने ११० आले तर शहरातून १२९ प्रवासी मुंबईला गेले. दुपारी हैदराबादहून ७९ आले व शहरातून ७८ गेले. दिल्लीहून शहरात १७८ आले तर दिल्लीला १९० प्रवासी गेले.

मुंबई, दिल्ली, हैदराबादच्या सेवेला मोठी मागणी
१ नोव्हेंबर रोजी सर्व विमाने फुल्ल होती. इंडिगोने सकाळी मुंबईहून ६० प्रवासी आले तर १८६ प्रवासी गेले. हैदराबादहून सकाळी १६ प्रवासी आले आणि ७८ प्रवासी गेले. दुपारी हैदराबादहून ७८ आले तर तेवढेच प्रवासी परत गेले. दिल्लीहून १८० प्रवासी आले तर १८५ प्रवासी दिल्लीला गेल्याची माहिती इंडिगोचे व्यवस्थापक अनिरुद्ध पाटील यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...