आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी पुन्हा सूचना:उत्तरपत्रिका पळवणाऱ्या विद्यार्थ्याचे सर्व गुण रद्द

छत्रपती संभाजीनगर22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

उत्तरपत्रिका घेऊन पळून जाणाऱ्या विद्यार्थ्याचा (डब्ल्यूपीसी) ‘होल परफॉर्मन्स कॅन्सल’ (सर्व गुण रद्द) करण्यात येणार आहे. त्याचबरोबर पोलिसांकडील कारवाई सुरू राहील. विभागीय मंडळ चौकशी नेमून राज्य मंडळाला अहवाल पाठवणार आहे तसेच विद्यार्थ्यास बोर्डातही सुनावणीसाठी बोलावण्यात येणार आहे, अशी माहिती विभागीय मंडळाकडून देण्यात आली आहे.

माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या बारावीच्या लेखी परीक्षेस २१ मार्चपासून सुरुवात झाली. शुक्रवारी (३ मार्च) गणिताच्या पेपरदरम्यान लघुशंकेला जाण्याच्या बहाण्याने विद्यार्थी उत्तरपत्रिका घेऊन पळाल्याची घटना नागसेन माध्यमिक विद्यालय परीक्षा केंद्रावर घडली. याप्रकरणी विद्यार्थ्यावर चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नियमानुसार उत्तरपत्रिकेत अनधिकृतपणे बदल करणे, लिहिलेली उत्तरपत्रिका बाहेर घेऊन जाणे किंवा बाहेरून लिहून आणणे, एका विद्यार्थ्याऐवजी दुसऱ्याने परीक्षा देणे, परीक्षा केंद्रावरील कर्मचाऱ्यांबरोबरच प्रक्षोभक व्यवहार करणेे आदी गैरमार्गप्रकरणी शिक्षा सूचीप्रमाणे संबंधितांची संपूर्ण परीक्षेची परवानगी रद्द करून त्यांना पुढील पाच परीक्षांना बसण्यास प्रतिबंध करता येतो. विभागीय मंडळ उत्तरपत्रिका पळवणाऱ्या विद्यार्थ्याचे सर्व विषयांचे गुण रद्द करणार आहे. उत्तरपत्रिका बाहेर नेल्याप्रकरणी चौकशी समिती नेेमून त्याचा अहवाल राज्य मंडळास सादर करण्यात येईल. अशा प्रकरणातील विद्यार्थ्याची पुन्हा बोर्डातही सुनावणी घेण्यात येईल, असेही मंडळातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

सर्व शिक्षणाधिकारी, अधिकाऱ्यांची बैठक सोमवारी दहावीचा इंग्रजी भाषा विषयाचा पेपर आहे. शुक्रवारी छत्रपती संभाजीनगरमध्ये विद्यार्थी उत्तरपत्रिका घेऊन पळाल्याच्या घटनेनंतर मंडळाने गैरप्रकार घडू नयेत म्हणून पुन्हा शनिवारी अध्यक्ष अनिल साबळे यांच्या उपस्थितीत सर्व शिक्षणाधिकारी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या वेळी परीक्षेचा आढावा घेतला.

बातम्या आणखी आहेत...