आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सूचना:सर्व शाळांनी 16  ते 21 जानेवारीपर्यंत निसर्ग सहल काढावी ; केंद्रेकर

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

विद्यार्थ्यांना निसर्गाविषयी आवड निर्माण व्हावी, निसर्गाच्या सान्निध्यात राहून शिकण्याची संधी मिळावी, पक्षी, प्राणी, फळे, फुले, झाडे, वेलींची प्रत्यक्ष अनुभूती यावी आणि विद्यार्थ्यांचे निसर्गाविषयीचे प्रेम वृद्धिंगत व्हावे, या हेतूने औरंगाबाद विभागातील सर्व शाळांनी १६ ते २१ जानेवारीदरम्यान निसर्ग सहलीचे आयोजन करून निसर्ग सहलींचा अहवाल शिक्षणाधिकाऱ्यांनी निवडक छायाचित्रांसह विभागीय आयुक्तालयास ३१ जानेवारीपर्यंत सादर करावा, अशा सूचना विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी दिल्या आहेत.

त्यामुळे विद्यार्थ्यांना प्राणी, पक्षी, फळे, फुले, विविध वनस्पती, डोंगर, नद्या, टेकड्यांची माहिती मिळेल. तसेच विद्यार्थ्यांना त्याचे टिपण आणि बिया, पाने, फळे, पुलांचेही नमुने गोळा करण्यास सांगावे, अशा सूचना केल्या आहेत.सहलीनंतर विद्यार्थ्यांकडून सहलीचा अहवाल लिहून घ्यावा. सहलीदरम्यान विद्यार्थ्यांना वनभोजनाचा आनंद देत त्यांच्या गुणांना वाव मिळावा, यासाठी छोट्या कविता, गाणी, गोष्टी, कथा, नकला आदींचे आयोजन करावे.

बातम्या आणखी आहेत...