आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

उस्मानाबाद कोरोना:कोरोणाचा रुग्ण आढळल्यामुळे परंडा तालुक्यात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने राहणार बंद

उस्मानाबादएका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • जिल्हाधिकाऱ्यांनी एकाच दिवसात पुन्हा बदलले आदेश

परंडा तालुक्यात कोरोणाचा रूग्ण आढळल्यामुळे जिल्हाधिकार्‍यांना पुन्हा एका दिवसातच आपले आदेश बदलण्याची वेळ आली आहे. परंडा तालुक्यात आता केवळ अत्यावश्यक सेवा  सुरू राहणार असून अन्य दुकाने 17 मे पर्यंत बंद ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

सोमवारपासून जिल्ह्यातील सर्व दुकाने व आस्थापना ठराविक वेळेपर्यंत सुरू ठेवण्या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी शनिवारीच आदेश पारित केले होते. परंतु, परंडा तालुक्यात रुग्ण आढळून आल्यानंतर त्यांनी तातडीने आपले आदेश बदलले आहेत. एक दिवसच बस सेवा सुरू राहिल्यानंतर रुग्ण आढळल्याने बस सेवा तातडीने बंद करण्याचे निर्देश सोमवारी त्यांनी दिले. आता अत्यावश्यक सेवा वगळता परंडा तालुक्यात सर्व दुकाने बंद ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी दीपा मुंडे यांनी दिले आहेत.

परंडा तालुक्यातील शासकीय व निमशासकीय कार्यालये, पिण्यासाठी पाणीपुरवठा, सांडपाणी निचरा व्यवस्थापन, सर्व बँका, दूरध्वनी व इंटरनेट,  अन्न, भाजीपाला, दूध, किराणा दुकाने, दवाखाने, वैद्यकीय केंद्र, औषधे दुकाने, विद्युत पुरवठा, ऑइल-पेट्रोल ऊर्जा संसाधने, प्रसारमाध्यमे याच सेवा सुरू राहणार आहेत. यामध्ये किराणा दुकाने केवळ सकाळी आठ ते दुपारी दोन या कालावधीतच सुरू राहतील. उर्वरित जिल्ह्यात मात्र पूर्वीप्रमाणे दिलेल्या आदेशानुसार सर्व दुकाने सुरू राहणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...