आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाद:अभ्यागत समितीच्या सदस्यांचे घाटीतील भंगारावरून आरोप

छत्रपती संभाजीनगर11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

घाटीतील भंगार नेण्यावरून अभ्यागत समितीचे सदस्य अॅड. इक्बालसिंग गिल यांचे घाटी प्रशासनासोबत वाद झाले. भंगार ट्रकच्या माध्यमातून भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप इक्बालसिंग गिल यांनी केला. त्याचबरोबर या भंगारच्या गाडीसोबत कोणीही नसल्याचा दावा त्यांनी केला. त्यानंतर वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय कल्याणकर यांनी त्यांना कागदपत्रे दाखवत, टेंडर घेतलेला कंत्राटदारच भंगार घेऊन जात असल्याचे सांगितल्यानंतर वाद मिटला.

घाटीच्या अभ्यागत समिती सदस्य इक्बालसिंग गिल यांनी भंगार प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले. यासोबत कोणीही घाटीचा अधिकारी नसल्याचा आरोप त्यांनी केला. त्यानंतर प्रशासनाने सर्व कागदपत्रे त्यांना दाखवली. या वेळी घाटीतील एक ‘आरएमओ’, कर्मचारी आणि सुरक्षा रक्षक समवेत असल्याचे डॉ. विजय कल्याणकर यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...