आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विरोधाभास:खैरेंमुळे ‘समांतर’ रखडल्याचा आरोप करणाऱ्या भुमरेंची भूमिगत योजना 9 वर्षांपासून रखडली

रमेश शेळके | पैठण24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नेते, माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्यामुळे समांतर जलवाहिनी योजना रखडली, असा आरोप पालकमंत्री संदिपान भुमरे सत्तांतरानंतर सातत्याने करत आहेत. मात्र, त्यांच्याच पैठण मतदारसंघात भूमिगत गटार योजना नऊ वर्षांपासून रखडली आहे.

पैठण-आपेगाव विकास प्राधिकरणातून १३ वर्षांपासून पैठण शहरात भूमिगत गटार योजनेचे काम सुरू आहे. ही याेजना पाच टप्प्यांत पूर्ण हाेणार आहे. परंतु, आतापर्यंत या याेजनेचे दोनच टप्पे पूर्ण झाल्याचा दावा महाराष्ट्र जीवन प्राधिकरण करत आहे. दोन वर्षांत ही योजना पूर्ण होणे आवश्यक हाेते. १४ वर्षांत या याेजनेच्या तिसऱ्या टप्प्यासाठी कुणीही निविदा घेण्यासाठी पुढे येत नसल्यामुळे दाेन वर्षांपासून काम रखडले अाहे. म्हणून मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडे योजनेच्या चौकशीची मागणी करणार असल्याचे माजी नगराध्यक्ष सूरज लोळगे यांनी सांगितले. या योजनेच्या कामाला २०१३ मध्ये सुरुवात झाली. ४६ कोटी रुपये खर्च करून पाच टप्प्यांत ही योजना दोन वर्षांत पूर्ण होणे अपेक्षित होते. पण नऊ वर्षानंतरही काम रखडले आहे.

बातम्या आणखी आहेत...