आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेवाज्येष्ठता:उपप्राचार्य केले जात नसल्याचा आरोप करत सभुसमोर आजपासून शिक्षकाचे उपोषण

औरंगाबाद8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सरस्वती भुवन शिक्षण संस्थेचे संचालक मंडळ आपल्यावर अन्याय करत असल्याचा आरोप उच्च माध्यमिक शिक्षक अनिल ओंकारराव सांगळे यांनी केला आहे. सेवाज्येष्ठता असतानादेखील आपल्याला उपप्राचार्य केले जात नाही, असा आरोप त्यांनी केला आहे. त्यामुळे प्रजासत्ताक दिनापासून कुटुंबासमवेत आमरण उपोषण करत असल्याचेही त्यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे कळवले आहे. माझा नैसर्गिक न्याय्य हक्क मागितला याचा राग मनात धरून संस्थेने माझी बदली वर्कलोड नसलेल्या ठिकाणी केली आहे. त्यामुळे आठ महिन्यांपासून पगार मिळालेला नाही. म्हणून संस्थेच्या मुख्यालयासमोर कुटुंबासह आमरण उपोषण करणार आहे, असे सांगळे यांनी म्हटले आहे. यासंदर्भात संस्थेचे सचिव डॉ. नंदकुमार उक्कडगावकर यांच्याशी संपर्क केला असता होऊ शकला नाही.

बातम्या आणखी आहेत...