आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पॉलिटेक्निकच्या दुसऱ्या फेरीत 9 हजार जागांचे वाटप:तिसऱ्या फेरीपर्यंत शिल्लक राहणार नाही शासकीय तंत्रनिकेतनच्या जागा

औरंगाबाद23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मराठवाड्यातील 10 शासकीय आणि 47 खासगी पॉलिटेक्निक महाविद्यालीयाच्या 15 हजार 40 जागा असून पहिल्या प्रवेश फेरीनंतर आता दुसरी प्रवेश फेरी सुरु झाली आहे. या फेरीसाठी विभागातून 9 हजार 795 जागा वाटप करण्यात आल्या आहेत.

दुसऱ्या फेरीत इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड टेलिकम्युनिकेशनला विद्यार्थी पसंती दर्शवत असून, या फेरीतच शासकीय तंत्रनिकेतनमधील जागा पूर्ण भरल्या जातील. अशी शक्यता प्रवेश समन्वयकांनी व्यक्त केली आहे.

21 हजार विद्यार्थ्यांची नोंदणी

तंत्रनिकेतन प्रथम व द्वितीय वर्षासाठी आवडीचे महाविद्यालय आणि आवडीची शाखा मिळालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेश निश्चितीसाठी 7 सप्टेंबर पासून सुरुवात झाली आहे. ही फेरी अकरा सप्टेंबरपर्यंत चालणार आहे. मराठवाड्यात एकूण 14 हजार 649 प्रवेश क्षमता असून, त्यासाठी 21 हजार 600 विद्यार्थ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे. तर दुसऱ्या फेरीसाठी 10 हजार 773 विद्यार्थ्यांनी ऑप्शन फॉर्म भरले होते.

बेटरमेंट ऑप्शन

त्यापैकी दुसऱ्या फेरीसाठी 9 हजार 795 जागांचे वाटप करण्यात आले. ऑनलाइन प्रवेश स्विकृतीसाठी विद्यार्थ्यांना 10 सप्टेंबर तर कागदपत्रांची पूर्ताता आणि शुल्क भरुन प्रवेश निश्चितीसाठी 11 सप्टेंबर पर्यंतची मुदत आहे. मात्र या फेरीतही काही विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे शाखा आणि महाविद्यालय न मिळाल्याने त्यांनी तिसऱ्या फेरीचा पर्याय निवडत बेटरमेंट ऑप्शन निवडले.

शंभर टक्के जागांचे वाटप

शासकीय तंत्रनिकेतनमध्ये एकूण 3 हजार 850 प्रवेश क्षमता आहे. या सर्व शंभर टक्के जागांचे वाटप झाले असून, त्या या दुसऱ्या फेरीतच पूर्ण भरल्या जातील.तसेच तिसऱ्या फेरीत सर्व जागा खुल्या होऊन मेरिटवरच भरल्या जातील असे तंत्रशिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले

बातम्या आणखी आहेत...