आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऋग्वेद, कठोपनिषद आणि भगवद्गीतेत वृक्षांचे पूजन सांगण्यात आले आहे. भारतीय परंपरेत वनांच्या भूमिकेनुसार श्रीवन, तपोवन आणि महावन अशी वर्गवारी केली आहे. गीतेत वटवृक्षाला जीवन वृक्ष म्हटले आहे तर पिंपळास ज्ञान किंवा बोधिवृक्ष म्हटले आहे. बोधिवृक्षाच्या छायेतच महात्मा गौतम बुद्धाला ज्ञानप्राप्ती झाली. पिंपळाचा वृक्ष ऑक्सिजनचा, प्राणवायूचा स्रोत मानला जातो. अशोक वृक्ष दु:खहरणाचे आणि आनंद वाढवण्याचे प्रतीक मानला जातो. बेलवृक्ष संतुलन आणि ज्ञानाचे प्रतीक समजले जाते. आवळ्याचे झाड जगण्यातील शारीरिक आणि मानसिक संतुलनाचे जैविक रूप आहे. हे पाच वृक्ष हर्बल उपचारांचा महत्त्वाचा भाग आहेत. पंचवटीत या पाच वृक्षांचे वर्णन आहे.
ईश्वराच्या विविध रूपांची विविध वृक्षांमध्ये पूजा केली जाते. शिवरूपाचे पूजन बेलवृक्षाच्या आराधनेत होणे हे त्याचेच उदाहरण. हजारो वर्षांपासून चालत असलेल्या नैसर्गिक उपचारांच्या शास्त्रात वृक्षांची भूमिका महत्त्वाची आहे. आयुर्वेदातील या विज्ञान शाखेचे प्रवर्तक महर्षी बृहस्पती भारद्वाज यांना मानले जाते. यात शरीराच्या संरचनेनुसार औषधी वृक्षांची संरचना मांडली आहे. चरक आणि सुश्रुत यांनी वृक्षांवर आधारित आयुर्वेद विज्ञानाच्या क्षेत्रात महत्त्वाचे योगदान दिले आहे. वृक्षांचे दोन भाग आहेत - मूळ आणि तंत्र. वृक्षांच्या फांद्या म्हणजे पाताळ, पृथ्वीला आकाश आणि ब्रह्मांडासोबत जोडणारे नेटवर्कचे तंत्रच आहे. हे तंत्र चेतनामय आहे. सजीवांच्या हार्मोनल संतुलनाशी याचा जवळचा संबंध आहे. मानवासही वृक्षरूपात पाहू शकतो. मेंदू बीज आहे. त्यातून कार्यान्वित होणाऱ्या चेतना या फांद्या. त्यातूनच ज्ञान, चेतना, अंतरात्मा या क्रमाने विकास होतो.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.